Palghar Hospital Dispute News  Saam tv
मुंबई/पुणे

Palghar : शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखासह ११ जणांवर गुन्हा, पालघरमध्ये हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरण भोवलं

Palghar News : पालघरच्या रिलीफ हॉस्पिटलमध्ये उपचाराच्या बिलावरून वाद झाल्यानंतर कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप. शिंदेसेनेचा जिल्हाप्रमुख कुंदन संखेंसह ११ जणांविरोधात गुन्हा दाखल; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू.

Alisha Khedekar

  • पालघरच्या रिलीफ हॉस्पिटलमध्ये बिलाच्या वादातून कर्मचाऱ्याला मारहाण

  • शिंदेसेनेचे पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखेसह ११ जणांविरोधात गुन्हा

  • दहीहंडीमध्ये जखमी झालेल्या गोविंदाच्या उपचाराच्या बिलावरून वाद

  • मारहाणीची घटना हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

रुपेश पाटील, पालघर

डोंबिवलीमध्ये पालिकेच्या रुग्णालयात शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे यांनी डॉक्टरांना मारहाण केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता पालघरमधून बातमी समोर आली आहे. शहरातील रिलीफ हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याला शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पालघर पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्यासह एकूण ११ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती आहे.

नेमकं काय घडलं!

राज्यभरात काल दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. अनेक गोविंदा पथकांनी थर रचत हंडी फोडण्याचा प्रयत्न केला. काहींचा प्रयत्न यशस्वी झाला तर काही जण अयशस्वी ठरले. गोविंदा पथकांनी बऱ्याच दिवसांपासून या सगळ्याची तयारी सुरु केली होती. हे थर रचताना अनेक गोविंदा जखमी झाले. पालघरमध्ये अशाच एका पथकातील जखमी गोविंदावर रिलीफ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारानंतरच्या बिलाच्या रकमेसंदर्भात संबंधितांकडून हॉस्पिटल प्रशासनाशी चर्चा सुरू होती. याच मुद्द्यावरून वाद निर्माण झाला. वाद वाढत गेल्यानंतर काही जणांनी हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शिंदेसेनेचा पालघर जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल

मारहाणीच्या या घटनेनंतर हॉस्पिटल परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी प्रकरणाची दखल घेतली. रात्री उशिरापर्यंत पालघर पोलीस ठाण्यात तक्रार आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. मारहाण करणाऱ्यांमध्ये शिंदेसेनेचा पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे असल्याचे समोर आले. त्यानंतर कुंदन संखेसह ११ जणांविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड

दरम्यान, हॉस्पिटलमध्ये घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली असून, पोलिसांकडून या फुटेजची तपासणी केली जात आहे. या फुटेजच्या आधारे घटनेतील नेमकी परिस्थिती आणि संबंधित व्यक्तींची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पालघर पोलीस करत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधितांकडून याबाबत काय भूमिका मांडली जाते, तसेच पोलिसांच्या तपासात आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT