मुंबई महापालिकेत भाजप-शिंदेसेनेच्या युतीला जनतेनं कौल देऊन 10 दिवस उलटले.. मात्र महत्त्वाच्या समित्या आणि महापौरपदावरून दोन्ही मित्रपक्षांमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरु आहे... त्यातच आता शिंदेसेनेनं भाजपवर कुरघोडी करत.. अस्तित्वासाठी नवा डाव टाकलाय...शिंदेसेनेनं मुंबई महापालिकेत स्वतंत्र गटनोंदणी करण्याची रणनीती आखलीय..
संयुक्त नोंदणी केली तर भाजप-शिंदेसेनेचा गटनेता एकच असेल. संयुक्त गट झाल्यास शिंदेसेनेच्या किती सदस्यांना प्रतिनिधित्व द्यायचे याचा निर्णय भाजपकडे राहील. महापालिका सभागृहात आणि अन्य सर्व समित्यांमध्ये जी भूमिका भाजप घेईल त्याला समर्थन देणे शिंदेसेनेला बंधनकारक राहील.याशिवाय दोन्ही पक्षांसाठी महापालिकेत स्वतंत्र नव्हे तर एकच कार्यालय मिळू शकेल.
त्यामुळे शिंदेसेनेकडून स्वतंत्र गट म्हणून नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा... स्वतंत्र गट स्थापन केल्यास पक्षीय बलाबलनुसार स्थायी समितीवर भाजपचे 8 आणि शिंदेसेनेचे 3 सदस्य जाऊ शकतात...
महापालिकेत एकच गट स्थापन केल्यास महायुतीला स्थायी समितीत एक जागा आणखी पदरात पाडून घेता येईल...मात्र शिंदेंनी स्वतंत्र गट नोंदणी करून हा प्रश्न अस्तित्वाचा केल्यास त्याचा फटका महायुतीला बसू शकतो...त्यात भविष्यातील सत्तेचे फासे उलटे पडल्यास महापालिकेतील या समित्यांमधून भाजपवर कुरघोडी करण्याची दूरदृष्टी शिंदेसेना आखतेय..हे निश्चित...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.