ramdas kadam Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : भाजपच्या काही आमदारांना माज आलाय; शिंदेंच्या नेत्याने फडणवीसांचं नाव घेत केलं आवाहन

eknath shinde group leader ramdas kadam news : शिंदेंच्या नेत्याने देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत आव्हान दिलं आहे. भाजपच्या काही आमदारांना माज आलाय, असं म्हणत रामदास कदम यांनी टीका केली.

Vishal Gangurde

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई : भाजप आमदार परिणय फुके यांच्या वक्तव्याने महायुतीत ठिणगी पडली आहे. फुकेंच्या वक्तव्याने महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. फुकेंच्या वक्तव्याला आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपच्या काही आमदारांना माज आलाय, असं म्हणत शिंदेंचे नेते रामदास कदम यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

आगामी निवडणुकीआधीच महायुतीमधील अंतर्गत वाद समोर येऊ लागले आहेत. आता शिंदेंच्या नेत्यांकडून भाजप नेत्यांवर टीका होऊ लागली आहे. रामदास कदम यांनीही भाजपच्या काही आमदारांवर टीका केली. रामदास कदम म्हणाले, 'परिणय फुके प्रकरणात स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावं. भाजपच्या काही आमदारांना माज आला असेल, त्यांचे बाप किती मला माहिती नाहीत. शिवसेनेचा बाप, स्वतःला म्हणण्याआधी स्वतःचे बाप किती, ते अगोदर तपासून घ्या, मग शिवसेनेचा बाप काढा'.

'माझी देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, यात स्वतः वैयक्तिक लक्ष घालावं, ज्यांना माज आला असेल तर, त्यांचा माज उतरावा. एकनाथ शिंदे यांनी इतका मोठा निर्णय घेतला. त्यांची 35 देशांनी त्याची दखल घेतली. अडवाणीसाहेब असू देत, मुंडेसाहेब असू देत, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी बाळासाहेबांसोबत युती टिकवली. ती शिवसेना-भाजप युती करण्याचा निर्णय एकनाथ शिंदेंनी घेतला, असे कदम म्हणाले.

भाजप आमदार विजयकुमार गावित यांच्यावर टीका करताना रामदास कदम म्हणाले, 'जनता तीन-तीन लाखांच्या मताने निवडून देते, त्या युतीच्या आमदारांबाबत असं बोलतात. या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी वैयक्तिक लक्ष घालावं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांनी यात लक्ष घालावं, ज्यांना माज चढलाय, त्यांचा माज त्यांनी उतरावा'.

भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांना 'बामदास छमछम' म्हणत टीका केली. भास्कर जाधव यांच्या टीकेवर कदम म्हणाले, 'आमच्याकडे शिमग्यात गोमू नाचते. आम्ही त्याला शिमग्यातील गोमू म्हणतो. हा स्टेज वरती नाचतो, त्या नाचणाऱ्याला काय म्हणतात, तो शब्द मी वापरणार नाही, अशा नाचावर बोलणं ठीक नाही. त्यांना जनतेने उत्तर दिलेलं आहे. ते अगदी काठावर निवडून आले आहेत'.

'लोक त्याला सोडून चालले आहेत. त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. तो कुणावर काही बोलत सुटलेला आहे. त्याला अधिक किंमत द्यायची नाही, अशी टीका रामदास कदम यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मासिक पाळीमुळे चाचणी चुकणार नाही! महिला पोलीस उमेदवारांसाठी सरकारचा दिलासादायक निर्णय

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत अवकाळीचा शेतकऱ्यांना फटका

प्राणीप्रेमींसाठी खास पर्वणी! पुण्यात 'सकाळ पेटोपिया २०२६' महोत्सवाला सुरुवात; शहामृग अन् मकाऊ पोपट ठरतायत मुख्य आकर्षण

माजी शिक्षणमंत्र्यासह 565 जणांना अटक; सरकारच्या माजी प्रमुखाचं घर जाळलं, आणखी एक देश सत्तांतराच्या उंबरठ्यावर

Train Facts : रेल्वेच्या ट्रेन क्रमांकात दडलाय खास कोड! प्रत्येक अंक सांगतो गाडीची माहिती

SCROLL FOR NEXT