eknath shinde  EknathShindeTwitter/SaamTV
मुंबई/पुणे

Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका; गुप्तचर विभागाला मिळाली माहिती

मुंबईमधून मोठ वृत्त समोर आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Eknath Shinde News : मुंबईमधून मोठ वृत्त समोर आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. आत्मघाती हल्ला करून मारण्याची धमकी (Threat) मिळाली आहे. गुप्तचर विभागाला ही माहिती मिळाली. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी (Police) योग्य खबरदारी घेतली आहे. तसेच पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. गुप्तचर विभागाला सदर माहिती मिळाली. मुख्यमंत्र्यांना धमकी मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देखील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही महिन्यांपूर्वी देखील जिवे मारण्याची धमकी मिळाली होती.

मुख्यमंत्र्यांना या आधी जिवे मारण्याचे धमकी पत्र त्यांच्या कार्यालयात आले होते. तसेच धमकीचा निनावी फोन देखील आला होता. मुख्यमंत्र्यांना या आधी नक्षलवाद्यांनी देखील जिवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना धमकी मिळाली आहे.

केंद्र सरकारने पीएफआय संघटनेवर पाच वर्षांसाठी आहे, त्याचा या धमकीशी संबंध आहे का ? याचाही तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांना धमकी मिळाल्यानंतर काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'हा महाराष्ट्र आहे, उत्तर प्रदेश नाही. मुख्यमंत्र्यांना कोणी धमकी देत असेल तर आमचे पोलीस सक्षम आहेत. पोलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आलेल्या धमकीची चौकशी करावी, असे अस्लम शेख म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT