Devendra Fadanavis and eknath Shinde
Devendra Fadanavis and eknath Shinde  saam tv
मुंबई/पुणे

भाजप स्वत:कडेच ठेवणार महत्वाची खाती? मोठ्या खात्यांसाठी 'या' मंत्र्यांच्या नावाची चर्चा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: एक महिन्यानंतर शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला आहे. आज सकाळी शिंदे गटातील ९ तर भाजमधील ९ आमदारांनी शपथ घेतली. आता खाते वाटपाची चर्चा सुरू झाली आहे. भाजपने शिंदे गटाला मुख्यमंत्रीपद सोडले आहे, त्यामुळे आता महत्वाची खाती भाजप स्वत:कडे ठेवणार असल्याचे बोलले जात आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत:कडे गृह आणि अर्थ खाते ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुधीर मुनगंटीवर यांना उर्जा खाते, विखे-पाटील यांना महसूल खाते शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांना उद्योग खाते मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हे देखील पाहा

दरम्यान, शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यातून अनेक आमदारांना डावलण्यात आले. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले अनेक भाजप आमदार तसेच शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह्याद्री अतिथीगृहावरील आमदारांसोबतच्या बैठकीत या नाराजीचा उद्रेक झाल्याची माहिती समोर येत आहे.

PM मोदींचे जुने ट्विट पोस्ट करत सुप्रिया सुळेंचा शिंदे-फडणवीसांवर नेम

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. उशीरा का होईना राज्याला मंत्री मिळाले ही आनंदाची बाब आहे. मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असं ट्विट खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे, तर या ट्विट मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जुने ट्विट शेअर केले आहे.

'स्वतः पंतप्रधान मा. नरेंद्रीजी मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ 'होम मेकर' असू नयेत तर त्या 'नेशन बिल्डर' असाव्यात असं ते सांगतात. राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय आहे, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी या ट्विट मध्ये म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

Kia आणि Toyota च्या या 7 सीटर कार्सची किंमत 11 लाखांपेक्षाही आहे कमी, मिळतात हाय क्लास फीचर्स

Lok Sabha election: मुंबई, ठाणे, रायबरेलीसह ४९ जागांवर आज मतदान, ५व्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला

Gullak 4 Trailer: अन्नू गुप्ताची प्रेमकहाणी होणार सुरू; नव्या भागात काय असणार गुप्ता कुटुंबाचा वाद

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

SCROLL FOR NEXT