Eknath Shinde, Bacchu Kadu Saam Tv
मुंबई/पुणे

नाराजीनाट्यानंतर बच्चू कडू आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

मंत्रिमंडळात आमदार बच्चू कडू यांना मंत्रिपद न दिल्यामुळे बच्चू कडू नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: सत्तास्थापनेच्या एक महिन्यानंतर शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) मंत्रिमंडळाचा विस्तार काल झाला. शिंदे गटातील ९ तर भाजमधील ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळात आमदार बच्चू कडू यांना मंत्रिपद न दिल्यामुळे बच्चू कडू नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे आज ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी नंदनवन मध्ये आले आहेत.

मंत्रिमंडळ विस्तारात नाव न आल्याने बच्चू कडू नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. अपक्ष आमदारांपैकी एका आमदाराला तरी पहिल्या यादीत स्थान मिळायला हवे होते ही बच्चू कडू यांनी साम टिव्हीशी बोलताना खंत व्यक्त केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुढच्या यादीत मंत्री पद मिळेल असे आश्वासन दिले असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली होती.

आमदार बच्चू कडू यांच्या नाराजी नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना नंदनवन बंगल्यावर बोलवल्याची माहिती समोर येत आहे. या संदर्भात बोलताना, विकासकामांसाठी आज भेट घेत असल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

मंत्रिपदासाठी अब्दुल सत्तारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मध्यरात्रीच घेतली होती भेट

मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी समजूत काढली असल्याचे बोलले जात आहे. अनेकांनी मंत्रिपदासाठी दावा केला होता, पण काल अनेकांचा पत्ता कट झाला त्यामुळे आता नाराजी असल्याचे बोलले जात आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार ठरला तेव्हा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंगोली, नांदेड दौऱ्यावर गेले होते. ते सोमवारी दौरा करुन रात्री मुंबईत दाखल झाले. यानंतर मध्यरात्री मुंबईत नंदनवन बंगल्यात खलबते सुरू झाली.

काही दिवसापूर्वी टीईटी घोटाळा समोर आला होता, या घोटाळ्यात मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे असल्याची बातमी आली होती, त्यामुळे सत्तार यांचा मंत्रिपदावरुन पत्ता कट होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. (Eknath Shinde Latest News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati rahuri bypolls election results : बारामती-राहुरीत कोण मारणार बाजी? थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात

Election Result Live : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी की भाजप? तामिळनाडूत कोण मारणार बाजी? पाहा प्रत्येक अपडेट

GT vs PBKS: पंजाब किंग्सचा सलग दुसरा पराभव, रोमांचकारी सामन्यात गुजरातनं बाजी मारली

Assembly Elections Result 2026: पश्चिम बंगालसह ५ राज्यात कुणाची सत्ता येणार? काही तासांत चित्र होणार स्पष्ट

इराणचा नवा 14 कलमी शांतता प्रस्ताव; युद्धविराम प्रस्तावावर चर्चा होणार की तणाव वाढणार?

SCROLL FOR NEXT