eknath shinde news  Saam tv
मुंबई/पुणे

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा ब्राह्मण समाजाकडून गौरव; उपमुख्यमंत्र्यांना ‘समाजस्नेह पुरस्कार’ जाहीर

Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा ब्राह्मण समाजाकडून गौरव करण्यात आलाय. उपमुख्यमंत्र्यांना ‘समाजस्नेह पुरस्कार’ जाहीर करण्यात आलाय.

Saam Tv

ब्राह्मण जागृती सेवा संघाचा ‘समाजस्नेह पुरस्कार’ एकनाथ शिंदे यांना घोषित

पुण्यातील टिळक स्मारक मंदिर पुरस्कार वितरण सोहळा होणार.

श्री माणिकप्रभू महाराज यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

कार्यक्रमात समाजभूषण आणि युवा गौरव पुरस्कारांचाही समावेश

पुणे : ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्ताने देण्यात येणारा ‘समाजस्नेह पुरस्कार’ राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना जाहीर करण्यात आलाय. दत्त संप्रदायातील महत्त्वाचे क्षेत्र असणाऱ्या कर्नाटकातील श्री माणिकप्रभू संस्थानचे पीठाधीश ज्ञानराज माणिकप्रभू महाराज यांच्या हस्ते पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात रविवारी (ता. १२) सायंकाळी सहा वाजता हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

‘या पुरस्कारासोबतच समाजभूषण, युवा गौरव पुरस्काराचे वितरण देखील याप्रसंगी होणार आहे. ‘समर्थ रामदास स्वामींचे भक्त असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री पदावर करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे ते नेते आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव ब्राह्मण समाजातर्फे व्हावा, अशी पुरस्कार निवड समितीची मनापासून इच्छा आहे.

एकनाथ शिंदेंच्या या सन्मानामुळे समाजातील एकोपा अधिक वाढण्यास मदत होईल’’ असे मत संस्थेचे कार्याध्यक्ष पं. अतुलशास्त्री भगरे यांनी व्यक्त केले. याआधी हा पुरस्कार उज्वल निकम, शेषराव मोरे, भरतकुमार राऊत, देशाचे माहिती आयुक्त उदय माहूरकर आदी मान्यवरांना देण्यात आला आहे.

कार्यक्रमास जास्तीतजास्त समाजबांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजकांतर्फे करण्यात आलं आहे.

पुरस्कार कोण देणार आहे?

कर्नाटकातील श्री माणिकप्रभू संस्थानचे पीठाधीश ज्ञानराज माणिकप्रभू महाराज यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुरस्कार दिला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautami Patil: गौतमी पाटीलला अटक होणार? कार अपघातापूर्वीचा सीसीटीव्ही समोर

Ro-Ro Service: 200 प्रवासी आणि 75 वाहनं असलेली रो रो बोट अडकली; विरारच्या समुद्रातील थरार

Mumbai : मुंबईकरांसाठी खूशखबर! वाहतूक कोंडीतून सुटका होणार; महत्वाच्या महामार्गाबाबत घेतला मोठा निर्णय

Fire Incident : चालत्या कारला भीषण आग, सीएनजी गळतीमुळे भडका उडाला; चालकाचा होरपळून मृत्यू

Gold Coins Found: समुद्रात सापडला खजिना, सोनं, चांदीच्या नाण्यांचा पेटारा

SCROLL FOR NEXT