Eknath Shinde Health Update : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीमध्ये अद्याप सुधारणा झाली नसल्याचे समोर आलेय. तीन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांना १०५ डिग्री ताप आलेला, त्यामुळे दरे गावात त्यांच्यावर उपचार झाले. पण मुंबईत परतल्यानंतरही शिंदे यांच्या प्रकृतीमध्ये जास्त सुधारणा नसल्याचे समोर आलेय. एकनाथ शिंदे यांच्यावर उपचार सुरू आहेत.
एकनाथ शिंदे यांची प्रकृती अद्याप सुधारली नसल्याचे समोर आलेय. एकनाथ शिंदे यांच्यावर ज्यूपिटर रुग्णालयातील डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. सतत ताप येत असल्यामुळे त्यांना अँटी बायोटिक औषधे सुरू करण्यात आली आहेत. एकीकडे सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू असतानाच एकनाथ शिंदे आजारी पडले आहेत. त्यामुळे त्यांना सर्व बैठका रद्द कराव्या लागल्या आहेत. डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता.
एकनाथ शिंदे यांच्या रक्तातील पांढऱ्या पेशी कमी झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत आहेत. त्यातच अंगात तापही आहे. अशक्तपणा आल्यामुळे एकनाथ शिंदे यांना सलायन लावण्यात आले. डेंग्यू आणि मलेरियाची लक्षणे जाणवत असल्यामुळे एकनाथ शिंदे यांची चाचणी करण्यात आली. एकनाथ शिंदे यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी निगेटिव्ह आली आहे.
गेल्या आठवड्यात एकनाथ शिंदे अचानक सातऱ्यातील दरे गावात गेले होते. दिल्लीमध्ये अमित शाह यांच्यासोबतची बैठक झाल्यानंतर एकनाथ शिंदे दरे गावात गेले होते. दरे गावात गेल्यानंतर त्यांना ताप आला होता. १०५ इतका त्यांना ताप आला होता. त्याशिवाय अशक्तपणाही होता. फॅमिली डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता. पण राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडी वेगात सुरू होत्या.त्यामुळे शिंदेंना मुंबईत परत यावं लागले. आता मुंबईमध्ये आल्यानंतरही शिंदेंच्या प्रकृतीमध्ये अद्याप सुधारणा झाल्याचं दिसत नाही. आज एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्यासोबत नियोजित बैठक होणार होती. आता आजारपणामुळे शिंदे बैठकीला जाणार का? याची राजकीय चर्चा सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.