Maharashtra Politics, Eknath shinde, Uddhav Thackeray, Supreme Court Saam Tv
मुंबई/पुणे

धनुष्यबाण चिन्ह गोठवा, शिंदे गटाची मोठी मागणी; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?

शिंदे गटाच्या वकिलांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केली

साम टिव्ही ब्युरो

Shivsena Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) महत्वपूर्ण सुनावणी झाली. घटनापीठाच्या ५ न्यायमूर्तींसमोर आजची सुनावणी पार पडली. दरम्यान, सुनावणी सुरू असताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाने एक मोठी खेळी खेळली. शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी थेट धनुष्यबाण हे चिन्हं गोठवण्यात यावं असा युक्तिवाद केला. (Eknath Shinde Todays News)

शिंदे गटाकडून हा युक्तीवाद करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र, घटनापीठाने शिंदे गटाचा हा युक्तीवाद मान्य केला नाही. यासंदर्भात निवडणूक आयोग आणि शिवसेनेची बाजू ऐकून घेतली जाणार आहे. त्यानंतरच या प्रकरणावर घटनापीठ सुनावणी देणार आहे.

आज सुप्रीम कोर्टात काय घडलं?

आज घटनापीठासमोर सुनावणीला सुरूवात होताच, शिंदे गटाच्या वकिलांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केली. कायद्यानुसार पक्षचिन्हाबाबतचे सगळे निर्णय निवडणूक आयोग घेऊ शकतं, आयोगाची कार्यवाही कोर्टाने थांबवू नये, असा युक्तिवादही शिंदे गटाच्या वकिलांनी केला.

शिंदे गटाच्या युक्तिवादानंतर चिन्हाचा निर्णय घेण्याआधी आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घ्या, असा युक्तिवाद ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला. यावर कोर्टाने शिंदे गटाच्या वकिलांना प्रतिप्रश्न करत आतापर्यंतच्या ऑर्डरमध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीमध्ये काही आदेश दिलेले आहेत का? असं विचारलं. त्यावर लेखी उल्लेख नसल्याचं शिंदे गटाच्या वकिलांनी सांगितलं.

दरम्यान, कोर्टाने शिंदे गटाकडून धनुष्यबाण गोठवण्याची करण्यात आलेली मागणी अमान्यय करण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतलयानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या २७ सप्टेंबर रोजी होईल असं घटनापीठाने स्पष्ट केलं. इतकंच नाही तर, शिवसेनेच्या पक्षचिन्हासंदर्भात निवडणूक आयोगाने २७ तारखेपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश सुद्धा घटनापीठाने दिले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag Panchami 2025: नाग पंचमीला किचन मधील या वस्तू वापरू नका, नाहीतर...

Prakash Solanke: मुंडेंच्या वापसीवर राष्ट्रवादीत नाराजी? कॅबिनेट मंत्रिपदावरून प्रकाश सोळंकेंचा पक्षश्रेष्ठींवर निशाणा

हृदयद्रावक! दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आली, बाप अन् २ मुलींचा मृत्यू, बारामतीत भयंकर अपघात

Maharashtra Live News Update: भिमाशंकर भोरगिरी परिसरात मुसळधार पावसामुळे निसर्गाचं सौंदर्य बहरलं

Potato Eating Tips : बटाटा सोलून खावा की सालीसकट? वाचा फायदे- तोटे

SCROLL FOR NEXT