Shivsena Dasara Melava
Shivsena Dasara Melava Saam TV
मुंबई/पुणे

Dasara Melava : आम्ही विचारांचे वारसदार! शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याचं पोस्टर्स रिलीज

Satish Daud-Patil

Shivsena Dasara Melava : शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळ्याव्याला काही दिवसच शिल्लक उरले असताना शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याचं (Dasara Melava) पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या पोस्टवर शिवसेनेच्या धनुष्यबाणाचं चिन्ह लावण्यात आलं आहे. धनुष्यबाण चिन्ह कुणाचं हा प्रश्न निवडणूक आयोगाकडे प्रस्तावित असताना देखील शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या बॅनर्सवर धनुष्यबाणाचं चिन्ह दिसत आहे. (Eknath Shinde Group Dasara Melava Poster)

गेल्या काही दिवसांपासून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटात वाद सुरू होता. यानंतर मुंबई हायकोर्टाने उद्धव ठाकरे यांना शिवतीर्थावर म्हणजे शिवाजीपार्कवर दसरा मेळावा घेण्यास गेल्या आठवड्यात परवानगी दिली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाचा वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्समधील एमएमआरडीए मैदानावर दसरा मेळावा होणार आहे.

एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. यापार्श्वभूमीवर हे पोस्टर्स रिलीज करण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला २ ते ६ ऑक्टोबरपर्यंत शिवाजीपार्क मैदान दिले आहे. यासाठी २० हजार रुपये शुल्क आणि काही डिपॉझिट भरण्यात सांगितले आहे. (Latest Marathi News)

दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा गटांकडून सुद्धा दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. "काळ कसोटीचा आहे पण काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे, चलो शिवतीर्थ" असं मजकूर ठाकरे गटाच्या बॅनर्सवरून झळकत आहे. यासोबत वाजत गाजत, गुलाल उधळत, शिस्तीने या असे सुद्धा लिहिले आहे.

दरम्यान, दोन्ही गटांकडून दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमावण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. दसरा मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होईल, असा दावा शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून करण्यात आला आहे. दसरा मेळाव्याच्या सभेसाठी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे.

शिवतीर्थावरील सभा गाजवण्यासाठी आणि शक्तिप्रदर्शन करण्यासाठी उद्धव ठाकरेंना ६० हजारांची गर्दी जमवण्याची आवश्यकता आहे. तर शिंदे गटाला एमएमआरडी मैदानावरील आपला पहिला दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी १ लाखाची गर्दी जमवण्याची गरज आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT