Eknath Shinde group master plan to contest 22 Lok Sabha seats in 2024 Uddhav Thackeray tension will increase Saam TV
मुंबई/पुणे

Eknath Shinde News: शिंदे गटाचा मास्टर प्लान, लोकसभेच्या 'इतक्या' जागा लढवणार; ठाकरेंचं टेन्शन वाढणार?

Eknath Shinde Group News: लोकसभेच्या २२ मतदारसंघांत शिवसेनेचा खासदार निवडून कसा येईल, यावर भर दिला जाणार आहे. विद्यमान १३ खासदारांचा निर्णय झाला आहे.

Satish Daud

Eknath Shinde Group Lok Sabha 2023 Election Strategy

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चबांधणी सुरू केली आहे. कोणत्या मतदारसंघात आपला उमेदवार निवडून येईल, याची चाचपणी सध्या केली जात आहे. शिंदे गटाने देखील लोकसभेसाठी रणनीती आखली असून निवडणुकीत ज्येष्ठ महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना नजरेसमोरच ठेवूनच प्रचाराची तयारी करण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी शिंदे गटाची बैठक झाली. या बैठकीत २२ लोकसभा जागांचा आढावा घेण्यात आल्याची माहिती शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आढावा बैठकीनंतर दिली. लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत, असं शेवाळे यांनी सांगितलं आहे.

लोकसभेच्या २२ मतदारसंघांत शिवसेनेचा खासदार (Shivsena) निवडून कसा येईल, यावर भर दिला जाणार आहे. विद्यमान १३ खासदारांचा निर्णय झाला आहे. उर्वरित ठिकाणी उमेदवारीबाबत भाजप आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील, असंही राहुल शेवाळे म्हणाले.

दरम्यान, गेल्या निवडणुकीत शिवसेनेने राज्यातील ४८ पैकी २२ लोकसभा जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी १८ जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेतील बंडानंतर १३ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. या खासदारांना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.

लोकसभेसाठी शिंदे गटाकडून प्रत्येक मंत्र्यावर दोन ते तीन जिल्ह्यांची जबाबदारी दिली जाणार आहे, त्याचबरोबर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विविध योजना प्रत्येक मतदारसंघात कशा प्रकारे राबविता येतील, याच्या सूचना खासदार आणि मंत्र्यांना देण्यात आल्या, असेही राहुल शेवाळे यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT