Eknath Shinde Government Saam TV
मुंबई/पुणे

रेशनकार्ड धारकांसाठी शिंदे सरकारचं दिवाळी गिफ्ट; शंभर रुपयांमध्ये मिळणार 'या' महत्वाच्या वस्तू

राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये शिधापत्रिकाधारकांच्या फायद्याचा आणि त्यांची दिवाळी गोड करण्याचा एक महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारच्या आजच्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये शिधापत्रिका धारकांच्याफायद्याचा आणि त्यांची दिवाळी (Diwali) गोड करण्याचा एक महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार शिधापत्रिकाधारकांना केवळ शंभर रुपयांमध्ये दिवाळीमध्ये लागणाऱ्या किराणा वस्तूंचे पॅकेज मिळणार आहे.

त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना (Ration Card Holders) राज्य सरकारकडून खास दिवाळी भेट मिळाली आहे. (Shinde-Fadnavis Government) राज्य सरकारच्या आज मंगळवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२२ रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयानुसार शिधापत्रिकाधारकांनी दुवाळीसाठी उपयुक्त असणारा रवा, चणाडाळ, साखर व तेल याचे प्रत्येकी एक किलो पॅकेज केवळ शंभर रुपयांत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

पाहा व्हिडीओ -

त्यामुळे या योजनेमुळे जवळपास राज्यभरातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच ७ कोटी लोकांना प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. त्यामुळे ही दिवाळी शिधापत्रिका धारकांनासाठी अधिकच गोड झाली आहे. दरम्यान, राज्यशासनाच्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meetings) आणखी महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

त्यामध्ये, आपत्ती व्यवस्थापनातील प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या कंपन्यांना प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नेमने. पोलिस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच घरबांधणीसाठी बँकांमार्फत कर्ज देणे. तर नागपूर मेट्रो रेल प्रकल्पास गती देण्यासह सुधारित खर्चास मान्यता देण्याचासारखे अन्य महत्वाचे निर्णय आज घेण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनसेचा जाहीरनामा येणार

Candidate List Party wise : निवडणूकीच्या रिंगणात किती पक्षांचे उमेदवार, शिवसेना-ठाकरे कोणत्या क्रमांकावर? अशी आहे संपूर्ण यादी

TMKOC Fame Jheel Mehta: कोण आहे भिडेंचा जावई? 'तारक मेहता' फेम सोनू लवकरच अडकणार लग्नबंधनात; तारीखही ठरली

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; प्रॅक्टिसदरम्यान 'या' फलंदाजाच्या हाताला दुखापत

Devendra Fadnavis : सत्तास्थापनेसाठी शरद पवारांसोबत चर्चा, बैठकीला अदानी नव्हते; देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT