Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Maharashtra Political News saam tv
मुंबई/पुणे

Breaking News: वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं, शिंदे-फडणवीसांमध्ये तासभर चर्चा; आज काहीतरी मोठं घडणार?

Shiv sena Mla Disqualification Result: शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाआधी पडद्यामागील घडामोडी वाढल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये मंगळवारी मध्यरात्री महत्वाची बैठक झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

Satish Daud

Mla Disqualification Maharashtra

शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाआधी पडद्यामागील घडामोडी वाढल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये मंगळवारी मध्यरात्री महत्वाची बैठक झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीत तिन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाल्याचं कळतंय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या बैठकीला राज्याच्या नवीन पोलीस महासंचालक रश्मी शुल्का देखील उपस्थित होत्या. सूत्रांच्या माहितीनुसार, आज शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल येणार असल्याने राज्यात कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

दोन्ही गटांमध्ये संघर्ष उफाळू नये, यासाठी काळजी घेतली जाणार आहे. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना राज्य सरकारकडून काही महत्वाच्या सूचना देखील देण्यात आल्याची माहिती आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज ऐतिहासिक निकालाचं वाचन करणार आहेत.

कुणाचे आमदार ठरणार अपात्र ठरणार?

ठाकरे गटाने एकनाथ शिंदे गटाच्या १६ आमदारांविरोदात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. तर शिंदे गटाकडून ठाकरेंच्या १४ आमदारांना अपात्र करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये आदित्य ठाकरे यांचा समावेश नाही. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या ठाकरे गटाच्या आमदार ऋतुजा लटके यांच्याविरोधात सुद्धा याचिका दाखल करण्यात आली नाही.

निकाल कुणाच्या बाजूने लागणार?

दरम्यान, आमदार अपात्रतेचा निकाल आमच्याच बाजूने लागणार, असा दावा दोन्ही गटांकडून करण्यात आला आहे. संविधानाला धरून विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला, तर ४० गद्दार घरी बसतील, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे, लोकशाहीत बहुमताला महत्व असतं. आमच्याकडे बहुमत असल्याने निकाल आमच्याच बाजूने लागणार, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनीही निकाल आमच्याच बाजूने लागणार असल्याचं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्टेजवर नवरदेवाची सटकली; नवरीला मारली लाथ अन् सासऱ्याला ही चोपला, नेमकं काय घडलं?

Dipika Kakar : लिव्हर कॅन्सरनंतर दीपिका कक्करची पुन्हा तब्येत बिघडली, VIDEO शेअर करत आजाराबद्दल सांगितले

IND vs SA: या 3 कारणांमुळे भारताचा दारूण पराभव; सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला लोळवलं

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 'या' दिवशी सुरू होणार मिसिंग लिंक

Gold Price Today: सोन्याने पुन्हा भाव खाल्ला, १० तोळ्यामागे २०,७०० रुपयांची वाढ; २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर किती?

SCROLL FOR NEXT