MP naresh mhaske.jpg 
मुंबई/पुणे

Thane : एकनाथ शिंदेंचा खासदार म्हस्केंना झटका, मुलाचे तिकिट कापले, आनंद आश्रमात कार्यकर्त्यांची गर्दी

Eknath Shinde denies ticket to MP son : ठाणे महापालिका निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंनी खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाला उमेदवारी नाकारली. एबी फॉर्म न मिळाल्याने आनंद आश्रमाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी, राजकीय चर्चांना उधाण.

Namdeo Kumbhar

Naresh Mhaske son Ashutosh ticket controversy : शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाचे तिकिट नाकारलेय. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता फक्त काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी झाली आहे. अनेकांना अद्याप पक्षाचा एबी फॉर्म मिळालेला नाही. ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडूनही उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात येत आहेत. पण शिंदेंनी नरेश म्हस्के यांच्या मुलाला उमेदवारी नाकारली आहे. एबी फॉर्म दिला नाही.

ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांचा मुलगा आशुतोष म्हस्के यांच्याकडून महापालिकेसाठी तयारी करण्यात आली होती. प्रभाग १९ मधून आशुतोष यांनी कार्यकर्त्यांच्या, लोकांच्या भेटी घेतल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून ते महापालिकेसाठी तयारी करत होते. दुसरीकडे मुलाला उमेदवारी मिळावी म्हणून खासदार नरेश म्हस्के यांनीही फिल्डिंग लावली होती. पण त्यांच्या सर्व प्रयत्नाला अपयश आले आहे. शिंदेंच्या शिवसेनेतील घराणेशाही विरोधात मीनाक्षी शिंदे यांनी पेटवलेल्या ठिणगीमुळेच म्हस्केंच्या मुलाला तिकिट मिळाले नसल्याची चर्चा ठाण्यात होत आहे.

ठाण्याचे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांचे चिरंजीव आशुतोष म्हस्के यांना उमेदवारी डावलल्या नंतर आनंद आश्रमाच्या समोर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. प्रभाग क्रमांक 19 मधून आशुतोष म्हस्के यांनी उमेदवारी मागितली होती. पण पक्षातील घराणेशाहीविरोधात रोष वाढल्यानंतर शिंदेंनी म्हस्केंच्या मुलाची उमेदवारी नाकारली. नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिकेत प्रभाग १९ मधून नगरसेवक म्हणून काम केलेय. त्याच प्रभागातून आशुतोष म्हस्के यांना उमेदवारी हवी होती. पण याला शिंदेंच्या शिवसेनेतून उघड विरोध करण्यात आला. त्यामुळेच शिंदेंनी म्हस्केंच्या पुत्राचे तिकिट कापले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT