पुणे जमीन घोटाळा प्रकरण: एकनाथ खडसे मुंबई सेशन कोर्टात अनुपस्थित  Saam Tv
मुंबई/पुणे

पुणे जमीन घोटाळा प्रकरण: एकनाथ खडसे मुंबई सेशन कोर्टात अनुपस्थित

खडसे आजारी असल्याने येऊ शकत नसल्याची माहिती वाकिलांनी कोर्टात दिली आहे.

सुरज सावंत

पुणे जमीन घोटाळा प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) मुंबई सेशन कोर्टात (Mumbai Session Court) अनुपस्थित राहिले आहेत. खडसे आजारी असल्याने येऊ शकत नसल्याची माहिती वाकिलांनी कोर्टात दिली आहे. क्रिटिकल ऑपरेशनसाठी बॉम्बे हॉसपिटलमध्ये दाखल असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पत्नी मंदाकिनी खडसे यांनी अटकपूर्व जामिनसाठी अर्ज दाखल केला आहे. ईडी तर्फे ह्या प्रकरणात चार्ज शीट फाईल करण्यात आली होती, त्यात खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी दोघांना आरोपी म्हणून दाखवण्यात आले होते. हे प्रकरण 2016 चं असुन त्यावेळी खडसे महसूलमंत्री असताना पदाचा चुकीचा वापर करून ही जमीन कमी पैशात खरेदी केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केला होता. या प्रकरणात खड़सेंचे जावई गिरीश चौधरी सध्या अटकेत आहेत.

दरम्यान, भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसे यांच्या पत्नींना मागे ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याबाबत समन्स बजाविण्यात आले होते. मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी Girish Chaudhari यांच्या नावाने एमआयडीसीची MIDC जमीन खरेदी करण्यात आली आहे. याप्रकरणी जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आले आहेत. चौधरी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. यापूर्वी देखील मंदाकिनी खडसे यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आली होती.

दरम्यान एकनाथ खडसे यांनी फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. ते म्हणाले होते ''मी जर एकही रुपया अनधिकृत कमवला असेल तर मी तुम्हाला दान करुन टाकेल''. भाजप मधून खडसेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर खडसे भाजप वरती सतत टीका करत असतात.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Symptoms of Heart Attack: महिनाभर आधीच दिसतात हार्ट अटॅक लक्षणं, या ५ संकेताकडे दुर्लक्ष करू नका

Pandharpur : सोलापूरमध्ये पावसाचा जोर, पंढरपुरातील चंद्रभागा नदीने इशारा पातळी गाठली |VIDEO

Dhangar Agitation : धनगर समाजाचे महाराष्ट्रात चक्काजाम, एकाही गाडी रस्त्यावर फिरू देणार नाही, आरक्षणावरून थेट इशारा

Driverless Auto:भारतात जगातील पहिली ड्रायव्हरलेस इलेक्ट्रिक ऑटो लाँच, कमी किमतीत जबरदस्त फीचर्स

Fire In Nalasopara: नालासोपारा पूर्वेत कपड्यांच्या दुकानाला भीषण आग; दोन दुकानं पूर्णतः खाक|VIDEO

SCROLL FOR NEXT