eight temples and six forts will be renovated and maintained in order by cm uddhav thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

आठ मंदिरांचा जीर्णोद्धार, सहा गड-किल्ल्यांचे संवर्धन होणार; मुख्यमंत्र्यांचे आदेश

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यातील ऐतिहासिक स्थळांचा वारसा जपण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठं पाऊल उचललं आहे. राज्यातील मंदिरे (Temples), गड-किल्ले (Forts) आणि संरक्षित स्मारके (Protected monuments) यांच्या जतन आणि संवर्धनाचे काम करतांना त्यांचे मुळ रुप, स्थान महात्म्य आणि इतिहास लक्षात घेऊन केले जावे, असे करतांना हे काम शास्त्रोक्त पद्धतीने व कालबद्धरित्या करण्यात येईल याचीही काळजी घेण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज दिले. मुख्यमंत्री संकल्पकक्षाच्या माध्यमातून विविध विभागांच्या २५ योजनांचा आपण स्वत: पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यासाठी पहिल्या टप्प्यात आठ मंदिरं आणि सहा गड-किल्ल्यांचा विकास आणि संवर्धन करण्यात येणार आहे. (eight temples and six forts will be renovated and maintained in order by cm uddhav thackeray)

हे देखील पहा -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांस्कृतिक कार्य विभागाच्या विविध विषयांचा आज आढावा घेतला. यामध्ये प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार, नवीन लेणी खोदणे, महावारसा सोसायटीची स्थापना करणे, गड- किल्ल्यांचे संवर्धन इ. विषयांचा समावेश होता. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांसमोर महावारसा सोसायटीच्यासंदर्भातील सादरीकरण करण्यात आले. यामध्ये एकूण ३७७ संरक्षित स्मारके आहेत. महावारसा सोसायटीच्या कार्यकक्षेसंदर्भातील तरतूदींच्या मान्यतेसाठी मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

पहिल्या टप्प्यात आठ मंदिरांचा जीर्णोद्धार

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, शासनाने प्राचीन मंदिरांचे जतन आणि संवर्धन करण्याचा निर्णय घेतला असून या अंतर्गत पहिल्या टप्प्यात आठ मंदिरांच्या जीर्णोद्धाराबरोबर परिसर विकासाचे काम करण्याचे निश्चित केले आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील धुतपापेश्वर, कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर, पुणे जिल्ह्यातील एकवीरा देवी, नाशिक जिल्ह्यातील गोंदेश्वर, औरंगाबाद जिल्ह्यातील खंडोबा, बीड जिल्ह्यातील भगवान पुरुषोत्तम, अमरावती जिल्ह्यातील आनंदेश्वर आणि गडचिरोली जिल्ह्यातील शिवमंदिराचा समावेश आहे. मंदिराचा जीर्णोद्धार करतांना या मंदिरांचे विकास आराखडे हे मंदिराचे मुळ रुप टिकवून ठेऊन करावे, परिसराचा विकास करतांना भाविकांच्या सोयी- सुविधा, वाहनतळे, स्वच्छतागृहे, जाण्या-येण्या मार्ग यांचाही विचार व्हावा तसेच याठिकाणी असलेल्या दुकानांची मांडणीही एकसारखी असावी जेणेकरुन येथे येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळता येईल.

पहिल्या टप्प्यात सहा गड-किल्ल्यांचे संवर्धन

मुख्यमंत्र्यांनी राजगड, तोरणा, शिवनेरी, सुधागड, विजयदुर्ग व सिंधुदर्ग या सहा गडकिल्ल्यांच्या जतन आणि संवर्धन कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले की, किल्ल्यांचा विकास हा किल्ल्यांचे पावित्र्य राखून मुळ स्वरूपात व्हायला हवा. यासाठी निश्चित करण्यात आलेल्या वास्तू विशारदकांनी किल्ल्यांचा संवर्धन आराखडा येत्या तीन महिन्यात सादर करावा. या आराखड्यामध्ये किल्ल्यांचे संवर्धन कशा पद्धतीने करण्यात येणार आहे याची माहिती द्यावी. वास्तू विशारदांनी जलदुर्गासह, किल्ल्यांचा इतिहास समजून घेऊन, तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून हे आराखडे तयार करावेत. यासंदर्भात दुर्गप्रेमी संघटनांची बैठक पुन्हा एकदा आयोजित करावी. तसेच या संघटनांकडे त्यांच्या क्षेत्रातील गड किल्ल्यांची स्वच्छता राखण्याचे काम देण्याबाबतही विचार केला जावा.

आधुनिक महाराष्ट्राची लेणी निर्माण करावीत

आधुनिक महाराष्ट्राची लेणी निर्माण करण्यासाठी याक्षेत्रात काम करणारे लोक आणि स्थळांचा शोध घेतला जावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या. पुढची काही शतके लोक या युगातील काम आणि वैशिष्ट्ये पाहू शकतील अशा लेण्या निर्माण करण्याच्यादृष्टीने योग्य स्थळे, शिल्पकार, त्या स्थळांचा भौगोलिक अभ्यास करून एक उत्तम संकल्पचित्र सादर करण्याचे आदेशही त्यांनी आज दिले.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT