Egg Price Rise Saam Tv
मुंबई/पुणे

Egg Price Rise : थंडी वाढली, अंडी महागली! डझनमागे किती रुपये मोजावे लागणार?

Egg Prices Rises Per Dozon To Rs 90 : दरवर्षीप्रमाणे यंदाही हिवाळ्यात अंड्याचे दर वाढले आहेत. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या हंगामात ख्रिसमस, नववर्षाचा सण आणि सेलिब्रेशनचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढते. तसेच या काळात व्यायाम करणारे लोक देखील अंड्याचे सेवन करतात. यंदाही हा ट्रेंड कायम असल्याने अंड्यांची मागणी वाढली आहे.

कोमल दामुद्रे

Egg Price Hike :

डिसेंबर महिना सुरु झाला की, थंडीचे प्रमाण देखील वाढू लागते. तापमानतील सततच्या चढउतारांमुळे थंडीचा कडाका जाणवत नसला तरी गारवा हा काही प्रमाणात अनुभवायला मिळाला आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही हिवाळ्यात (Winter Season) अंड्याचे दर वाढले आहेत. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या हंगामात ख्रिसमस, नववर्षाचा सण आणि सेलिब्रेशनचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढते. तसेच या काळात व्यायाम करणारे लोक देखील अंड्याचे सेवन करतात. यंदाही हा ट्रेंड कायम असल्याने अंड्यांची (Eggs) मागणी वाढली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घरगुती, बेकरी आणि हॉटेल्सकडून अंड्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या मुंबईत डझनभर अंड्यांसाठी दर ९० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. मागच्या आठवड्यात डझनभर अंड्यांसाठी ८० ते ८४ रुपये इतका दर होता. मागणी वाढल्याने आठवड्याच्या सुरुवातीला डझनभर अंड्यांचा दर थेट ६ ते१० रुपयांनी (Price) वाढून ९० रुपयांपर्यंत जाऊन ठेपला आहे.

यापूर्वी जानेवारी महिन्यात अंड्यांचा दर डझनमागे ९० रुपये इतका नोंदवण्यात आला आहे. नॅशनल एग कमिटीने प्रसिद्घ केलेल्या आकडेवारीनुसार, अंड्यांच्या खरेदीच्या डझनसाठीचा घाऊक दर हा ७८ रुपये इतका आहे तर दुकानदार १ अंडीसाठी ६ ते १० रुपये मोजत आहे.

मंगळवारी अंड्यांचा दर ६२० रुपयांवर येऊन पोहोचला आहे. अंड्यांचा भाव वाढण्याची कारणे अनेक आहेत. थंडीचा महिना असल्यामुळे अंड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. उत्तर भारतात अंड्यांची मागणी वाढल्यामुळे हैदराबादमध्ये याचा पुरवठा वाढला आहे. त्यामुळे मुंबईत अंड्यांची टंचाई वाढली आहे.

अंड्यांच्या भावात वाढल्याने अंडा पावसोबत अंडा भूर्जी आणि इतर अनेक पदार्थांवरही भाव वाढले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा अंडी खरेदी करताना सर्वसामान्यांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli : राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था; नागरिकांचे अनोखे आंदोलन, खड्ड्यात धान पिकाची रोवणी

Maharashtra Rain Live News: कल्याण पूर्वेतील नेतिवली टेकडी परिसरात दरड कोसळण्याची घटना

Vivek Agnihotri : मराठी जेवण म्हणजे गरीबांचं जेवण... विवेक अग्निहोत्री बरळले, पाहा VIDEO

Mumbai Rain: 'पालिका आयुक्तांचा जलअभिषेक करू', अंधेरीत पाणी साचल्यावर मनसेचा इशारा

Mumbai Rain: मुंबईत उद्या शाळांना सुट्टी? पुढचे १२ तास महत्वाचे, मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT