Nawab Malik Marathi News Saam Tv
मुंबई/पुणे

Nawab Malik : नवाब मलिक यांना मोठा धक्का! कोट्यवधींची संपत्ती ED ताब्यात घेणार

नवाब मलिक यांच्या तब्बल ८ मालमत्ता ईडी जप्त करणार असल्याची माहिती आहे.

साम टिव्ही ब्युरो

Nawab Malik News : एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ आता राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अडचणीतही वाढ होणार आहे. नवाब मलिक यांच्या तब्बल ८ मालमत्ता ईडी जप्त करणार असल्याची माहिती आहे. कुर्ला, वांद्रेमधील प्लॅट आणि उस्मानाबादमधील जमीनीचा यामध्ये समावेश आहे. ही मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी ईडी कायदेतज्ञ्जांसोबत चर्चा करणार आहे.

तसं पाहता नवाब मलिक यांच्या या संपत्तीवर ईडीने (ED) आधीच टाच आणली होती. मात्र, कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर आता ईडीकडून मलिकांच्या ८ मालमत्तांचा ताबा घेतला जाणार आहे. यामध्ये नवाब मलिक कुर्ल्यातील गोवावाल कंपाऊंड येथील मालमत्ता, उस्नानाबाद येथील १४७ एकरांची जमीन, मुंबईतील ३ सदनिका आणि दोन राहत्या घरांचा समावेश आहे.

'ईडी'ने फेब्रुवारी महिन्यात नवाब मलिक यांना अटक केली होती. त्यानंतर नवाब मलिक यांची सातत्याने चौकशी सुरु आहे. यादरम्यानच्या काळात ईडीने त्यांच्या मालमत्तांची माहिती गोळा केली होती. ही सर्व माहिती घेतल्यानंतर ईडीने नवाब मलिक यांच्या मालमत्तेवर टाच आणली होती. आता या मालमत्ता ईडीकडून ताब्यात घेतल्या जाणार आहे.

नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने अटक केली होती. या कारवाईने मोठी खळबळ उडाली होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली होती. लँड डीलशी संबंधित हे प्रकरण असून टेरर फंडिंग आणि मनी लाँडरिंगचा आरोप मलिक यांच्यावर करण्यात आला आहे.

दरम्यान, ईडीने केलेले सर्व आरोप मलिक यांनी अमान्य केले असून ईडीची कारवाईच बेकायदेशीर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नवाब मलिक तुरुंगात गेल्यानंतर भाजपने त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी लावून धरली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारने कोणत्याही परिस्थितीत नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधींसह INDIA ब्लॉकचे ८ नेते सर्वोच्च न्यायालयाकडे पायी रवाना

Hotel Safety Tips: हॉटेलमध्ये चेक-इन केल्यावर काय काय तपासून घ्यावे? 5 महत्वाच्या गोष्टी

Maharashtra News Live Update: माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकरांचा वीज अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचा व्हिडीओ व्हायरल

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना ₹२१०० सुरू होणार, नेमकं सत्य काय? सरकारनं दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT