ED News Saam Tv
मुंबई/पुणे

BMC Covid Scam: ठाकरे गटाच्या अडचणी आणखी वाढणार? सूरज चव्हाण यांना ईडीचं समन्स

Suraj Chavan News: ठाकरे गटाचे सचिव आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीने समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे.

Shivani Tichkule

सचिन गाड

Mumbai News Today: मुंबईत 21 जून रोजी अंमलबजावणी संचालनालयाने जवळपास 15 ठिकाणी धाडी टाकल्या. कोरोना काळातील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली होती. कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेच्या कथित घोटाळ्या प्रकरणी ईडीचं छापा सत्र सुरुच आहे. त्यात आता आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे.

ठाकरे गटाचे सचिव आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीने समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे. चव्हाण यांना सोमवारी म्हणजेच 26 जून रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

ईडीने बुधवारी चव्हाण यांच्या चेंबूर येथील घरी छापा टाकला होता. या छापेमारीत ईडीच्या हाती काही महत्त्वाची कागदपत्रे लागल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी (21 जून) सकाळी 9 वाजता सुरज चव्हाण यांच्या घरावर ईडीने (ED) छापा टाकला होता.

तब्बल 17 तास चव्हाण यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. सनदी अधिकारी संजीव जैयस्वाल, महापालिका उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्या घरीदेखील ईडीचे पथक धडकले. या धाडसत्रामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता चव्हाण यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. (Political News)

ईडीला धाडीत काय सापडले?

या कारवाईत ईडीच्या हाती तब्बल दीडशे कोटीच्या संपत्तीचे कागदपत्रे लागली आहे. यामध्ये 50 मालमत्तांची कागदपत्रे सापडल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केली आहे. तसेच 68 रुपयांच्या रोख रक्कम आणि 1 कोटी 82 लाखांचे सोन्याचे दागिने अधिकाऱ्यांच्या हाती लागले. त्याशिवाय, 15 कोटी रुपयांची मुदत ठेव असलेली कागदपत्रेही ईडीने ताब्यात घेतली आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : जिगरी यार गद्दार निघाला! रात्री बायकोसोबत बेडवर; रागात नवऱ्याने मित्राचा गळाच चिरला

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT