BMC Khichdi Scam Saam TV
मुंबई/पुणे

BMC Khichdi Scam: कथित खिचडी घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट; मुंबई महापालिका उपायुक्तांना ईडीकडून समन्स

BMC Khichdi Scam Latest News: पुरवठादरांने योग्य प्रमाणात खिचडी वाटप न करता पालिकेला कोट्यावधी रुपयांचा चुना लावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय.

Ruchika Jadhav

सचिन गाड

ED Has Summons Sangeeta Hansale:

कथित खिचडी घोटाळ्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने मुंबई महापालिका उपायुक्त संगीता हंसाळे यांना समन्स बजावलाय. बुधवारी त्यांच्यासह युवासेना सचिव सुरज चव्हाण आणि पाच कंत्राटदारांच्या कार्यालयांवर ईडीने छापे टाकले होते. त्यानंतर आता त्यांना समन्स बजावण्यात आला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोविड दरम्यान हंसाळे प्लॅनिंग विभागात सहाय्यक पालिका आयुक्त होत्या. पुरवठादारांकडून होणाऱ्या खिचडी वाटपावर देखरेख ठेवण्याची त्यांना जबाबदारी देण्यात आली होती. मुंबई महानगरपालिकेने कोविड काळात मजुरांसाठी खिचडी वाटप सुरू केलं होतं. मात्र पुरवठादरांनी योग्य प्रमाणात खिचडी वाटप न करता पालिकेला कोट्यावधी रुपयांचा चुना लावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय.

कंत्राट वाटपात देखील गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला असून अंमलबजावणी संचालनालयाने देखील तपासाला सुरुवात केली आहे.

खिचडी घोटाळ्या प्रकरणी संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्यासह १० ते १२ जणांविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुजीत पाटकर यांच्यासह सुनिल बाळा कदम, महापालिकेचे तत्कालीन सहा. आयुक्त, नियोजन, बीएमसी, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळूखे, फोर्सवन मल्टी सर्विसेसचे भागीदार आणि कर्मचारी, स्नेहा कॅटरर्सचे भागीदार, इतर बीएमसी अधिकारी आणि इतर संबंधित खासगी लोकांविरोधात हा गुन्हे दाखल करण्यात आलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT