Mumbai: ईडीची मोठी कारवाई; मुंबईत विविध ठिकाणी छापेमारी Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai: ईडीची मोठी कारवाई; मुंबईत विविध ठिकाणी छापेमारी

मुंबईमध्ये ईडीने मोठी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

सुरज सावंत

मुंबई: मुंबईमध्ये ईडीने मोठी कारवाई (ED Raids in Mumbai) करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई मधील विविध ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून छापेमारी सुरू आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याच्याशी संबंधित असलेल्या मालमत्तांच्या व्यवहारांच्या विषयी ही छापेमारी सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. एवढेच नाही तर महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ राजकीय नेता देखील ईडीच्या (ED) रडारवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ईडीची दिल्ली (Delhi) मधील टीम मुंबई (Mumbai) येथे दाखल झाली आहे.

हे देखील पहा-

ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या या धाडसत्राचे महाराष्ट्रात एका राजकीय (Political) नेत्याशी संबंध असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकूण ६ संपत्तींची चौकशी ईडीच्या टीमकडून सुरू आहे. दक्षिण मुंबई परिसरात ईडीच्या अधिकाऱ्यांकडून छापेमारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकूण ६ मालमत्तांची चौकशी सुरू आहे. या मालमत्तांचा संबंध काही राजकीय नेते, १९९३ बॉम्ब स्फोटात आरोपी, हसिना पारकर यांच्या संबंधात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

या धाडसत्रात एनआयएच्या (NIA) टीमचा तपासात मदत घेतली जात असल्याची माहिती समोर आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती आणि महाराष्ट्रात राजकीय नेत्यांमध्ये झालेल्या काही जागांच्या व्यवहाराविषयी हे धाडसत्र सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या संदर्भात अद्याप कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच हा राजकीय नेता कुठल्या पक्षाचा आहे आणि कोण आहे याविषयी कुठलीही अधिकृत माहिती अद्याप मिळू शकली नाही.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mandwa Gateway Of India Ferry : आता अलिबाग फक्त 'इतक्या' मिनिटांत! गेटवेपासून बोट सेवा पुन्हा सुरु; पाहा नवी वेळ आणि तिकीट

Maharashtra News Live Update: राहुल गांधींवरील एफआयआरच्या निषेधार्थ काँग्रेसचे तीव्र आंदोलन

Fruit Juice And Blood Sugar: फळांचा ज्यूस प्यायल्याने रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो?

मोठी दुर्घटना! समुद्रात बोट उलटली; भाजप नेत्याचा दुर्दैवी मृत्यू, कोकणाच्या राजकारणावर शोककळा

Pakistan cricket team: पाकड्यांचं डोकं फिरलं...! इंग्लंडविरुद्ध हरले म्हणून ७ खेळाडूंना बाहेर काढले; तिसऱ्या कसोटीपूर्व मुख्य प्रशिक्षकालाही हाकललं

SCROLL FOR NEXT