Shirdi: शिर्डी- साई मंदिराला दहशतवाद्यांचा धोका; दुबईतून आलेल्या 8 जणांनी केली रेकी

साईनगरी शिर्डीवर दहशतवाद्यांची क्रदृष्टी असल्याचे समोर आले आहे. दुबईवरुन आलेल्या दहशतवाद्यांकडून शिर्डीमध्ये रेकी केल्याची कबुली देण्यात आली
Shirdi: शिर्डी- साई मंदिराला दहशतवाद्यांचा धोका; दुबईतून आलेल्या 8 जणांनी केली रेकी
Shirdi: शिर्डी- साई मंदिराला दहशतवाद्यांचा धोका; दुबईतून आलेल्या 8 जणांनी केली रेकीगोविंद साळुंके
Published On

शिर्डी: साईनगरी शिर्डीवर दहशतवाद्यांची (terrorists) वक्रदृष्टी असल्याचे समोर आले आहे. दुबईवरुन आलेल्या दहशतवाद्यांकडून शिर्डीमध्ये (Shirdi) रेकी केल्याची कबुली देण्यात आली आहे. गुजरात (Gujarat) एटीएसने (ATS) अटक (Arrested) केलेल्या दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील (Pakistan) दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती समोर आली आहे. कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीवर (Shirdi) दहशतवाद्यांची वक्रदृष्टी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुबईवरुन आलेल्या दहशतवाद्यांनी शिर्डीत रेकी केल्याची कबुली दिली आहे.

हे देखील पहा-

या दहशतवाद्यांचे पाकिस्तानात दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे गुजरात एटीएसने यावेळी माहिती दिली आहे. शिर्डी आंतरराष्ट्रीय संवेदनशील देवस्थान असल्याने याआधी देखील साई मंदिराला (temple) धमकीचे (Threat) निनावी पत्र तसेच मेल आले आहेत. या दहशतवाद्यांनी शिर्डीचे मूळचे रहिवासी आणि सध्या दिल्लीत वास्तव्यास असणाऱ्या एका हिंदी चॅनेलच्या संपादकांच्या शिर्डीतील घरी आणि दिल्लीतील कार्यालयाची रेकी केल्याची कबुली देण्यात आली आहे. या दहशतवाद्यांकडून अवैध हत्यारे आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत.

Shirdi: शिर्डी- साई मंदिराला दहशतवाद्यांचा धोका; दुबईतून आलेल्या 8 जणांनी केली रेकी
Mumbai Pune Accident: मुंबई- पुणे एक्सप्रेसवर सहा वाहनांचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू...(पहा Video)

धक्कादायक घटना समोर आल्यावर शिर्डी शहरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. दुबई येथील अटक केलेले अतिरेकी मौलाना शब्बीर पठाण, अयुब झबरावाला, मौलाना गनी उस्मानी यांनी चव्हाणके यांच्या शिर्डी येथील घराची रेकी केली आहे. या अतिरेक्यांकडे अवैध हत्यारं, विस्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या अतिरेक्यांचे पाकिस्तानस्थित आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याचे गुजरात एटीएसने यावेळी सांगितले आहे.

याप्रकरणी अद्यापपर्यंत ६ मौलवींसह २ अशा एकूण ८ जणांना अटक करण्यात आली असून त्यांना १० दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वीही शिर्डी संस्थानाला धमकीचे फोन आणि मेल आले होते. जगप्रसिद्ध साईमंदिराच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात आले आहेत. अशातच मोठी यंत्रणा सज्ज आहे. तसेच, दहशतवाद्यांकडून रेकी करण्यात आल्याचे उघड होताच शिर्डीतील सुरक्षा व्यवस्थेत आणखी वाढ करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com