Yashwant Jadhav Saam Tv
मुंबई/पुणे

शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाची धाड

राष्ट्रवादी नंतर शिवसेना केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक, सुशांत सावंत

मुंबई - नवाब मलिक यांच्या नंतर दोन दिवसात मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष आणि शिवसेनेचे (Shivsena) नेते यशवंत जाधव यांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाचे (Income Tax) पथक दाखल झालं आहे. कारवाईचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई करण्यात आल्यामुळे राष्ट्रवादी नंतर आता शिवसेना केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवरआहेत का? अशा चर्चांना उधाण आले आहे.

हे देखील पहा -

इनोव्हा गाड्यांमधून पथक यशवंत जाधव यांच्या घरी दाखल झाले. CISF team देखील उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. यशवंत जाधव हे शिवसेना उपनेते आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नी यामिनी यशवंत जाधव या भायखळा मतदार संघाच्या आमदार आहेत.

त्यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागाने आज सकाळीच छापेमारी सुरु केली आहे. त्यांच्या घरासमोर तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, जानेवारी महिन्यात किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांची मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप केला होता. एवढेच नाही तर आयकर विभागाच्या हाती पुरावे लागले आहेत. जाधव यांचे पितळ उघडे करण्यासाठी आयकर विभागाला पाठपुराव्यास मदत करणार असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: लाडक्या बहिणीमुळे आमचा विजय - अजित पवार

Maharashtra Election Result: महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

SCROLL FOR NEXT