पालिकेचा 'फूड ऑन व्हील' उपक्रम; लवकरच ५० 'फूड ऑन व्हील' स्टॉल सुरू होणार

स्टॉल उभे करताना अटी, नियम देखील असणार आहेत. स्टॉल उभारण्याच्या ठिकाणी अग्निसुरक्षा, स्वच्छता आणि विव्रेत्यांना ड्रेसकोड आवश्यक असणार आहे. फूड ट्रकचालकांना सकस संतुलित आहार देण्यासाठी योग्य प्रकारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
BMC
BMCSaam Tv
Published On

मुंबई - पालिकेने 'फूड ऑन व्हील' उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईत (Mumbai) आता लवकरच ५० 'फूड ऑन व्हील' स्टॉल सुरू होणार आहेत. बेरोजगार, महिला बचतगट, गरजूंना रोजगार उपलब्ध करून देण्याससाठी पालिकेने हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या (BMC) विधी समितीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

या योजनेच्या अमलबजावणीसाठी पालिकेच्या परिमंडळाचे उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली पालिका समिती गठीत करणार आहे. समितीत विभागीय वाहतूक उपायुक्त, पोलीस उपायुक्त, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पालिकेच्या रस्ते विभागाचे कार्यकारी अभियंता, विभागातील सहाय्यक आयुक्त, विभागीय उपकार्यकारी आरोग्य अधिकारी असतील.

हे देखील पहा -

ही समिती या जागा निश्चित केल्यानंतर परवानगी देणार आहे. स्टॉल उभे करताना अटी, नियम देखील असणार आहेत. स्टॉल उभारण्याच्या ठिकाणी अग्निसुरक्षा, स्वच्छता आणि विव्रेत्यांना ड्रेसकोड आवश्यक असणार आहे. फूड ट्रकचालकांना सकस संतुलित आहार देण्यासाठी योग्य प्रकारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संबंधितांना आहारतज्ञांबरोबर काम करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

BMC
लग्नाचे आमिष दाखवत लोणावळ्यातील तरुणीला 15 लाखाला गंडवले

हे स्टॉल उभारल्यामुळे गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. स्टॉल मिळवण्यासाठी अर्जदार जास्तीत जास्त दोन स्पॉट मिळवण्यासाठी निविदा प्रक्रियेत भाग घेऊ शकतात. या स्टॉलसाठी आरोग्य परवाना शुल्क पाच हजार, पर्यटन स्थळाच्या ठिकाणी प्रतिवर्ष 20 हजार शुल्क तर प्रत्येक स्टॉलसाठी अनामत शुल्क एक लाख रुपये आकारण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com