Devendra Fadnavis news  saam tv
मुंबई/पुणे

पोलीस, गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा; म्हणाले...

शिंदे-फडणवीस सरकार विराजमान होताच पोलीस, गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी पोलीस , गिरणी कामगारांच्या घरांबाबत मोठी घोषणा केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

Devendra Fadnavis News : पोलीस, गिरणी कामगारांसाठी दिलासादायक बातमी आहे. पोलीस , गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. पोलिसांना पन्नास लाख ते २५ लाखापर्यंत हक्काची आणि परवडणाऱ्या घरांची घोषणा ठाकरे सरकारने केली होती. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार विराजमान होताच पोलीस, गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी पोलीस , गिरणी कामगारांच्या घरांबाबत मोठी घोषणा केली आहे.

आज पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. आजच्या अधिवेशनाच्या पाचव्या दिवसात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस , गिरणी कामगारांच्या घरांबाबत मोठी घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ५० हजार घर गिरणी कामगारांना उपलब्ध करून देऊ. गिरणी कामगारांसाठी घराची लॉटरी तत्काळ काढू आणि त्यांना घरे देऊ. तसेच बाडीडी चाळीत ५०० चौरस फुटाचे घर देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. आपण पोलिसांना नाममात्र दरात घर देण्याचा निर्णय घेऊ. ५० लाख आणि २५ लाखातील घरे परडवडणारे नाहीत. त्यामुळे त्याहीपेक्षा कमी किमतीत घरे देऊ. याचबरोबर पत्राचाळीतील लोकांना २५ हजार घर भाडे देऊ'.

देवेंद्र फडणवीसांना सफाई कर्मचाऱ्यांना देखील मालकीचे घर द्यायची घोषणा केली. 'सफाई कर्मचाऱ्यांना मालकीचे घर द्यायचे आहे. मुंबई महापालिकेतील २९ हजार सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काचे घर देणार. दोन वर्षांपूर्वी कोणाच्या आदेशाने हा निर्णय रद्द केला हे माहिती नाही. पण आम्ही त्यांना मालकी हक्काचे घर देण्याचा निर्णय घेतला आहे, असे फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांना सफाई कर्मचाऱ्यांना देखील मालकीचे घर द्यायची घोषणा केली. 'सफाई कर्मचाऱ्यांना मालकीचे घर द्यायचे आहे. मुंबई महापालिकेतील २९ हजार सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काचे घर देणार. दोन वर्षांपूर्वी कोणाच्या आदेशाने हा निर्णय रद्द केला हे माहिती नाही. पण आम्ही त्यांना मालकी हक्काचे घर देण्याचा निर्णय घेतला आहे, असे फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बलिप्रतिपदेच्या दिवशीची अनोखी परंपरा, गुराख्याच्या अंगावरून चालतो गायींचा कळप..

Rava Kheer Recipe: नवऱ्याचं तोंड करा गोड, घरीच बनवा रव्याची खीर

Mumbai Metro - 2B : मुहूर्त ठरला! 'मुंबई मेट्रो -२ ब' या दिवशी धावणार, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका

Bhudargar Fort History: कोल्हापूरातील ऐतिहासिक भुदरगड किल्ला माहितेय का? जाणून घ्या इतिहास आणि पर्यटकांसाठी टिप्स

लँडिंग होताना हेलिपॅड खचला, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हेलिकॉप्टरला भयंकर अपघात; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT