Representative image  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : पुण्यातील धक्कादायक घटना! दारूच्या नशेत मानसीने महिला PSI चा घेतला चावा, नेमकं काय झालं?

drunk woman bites female PSI in Pune police station : पुण्यातील बाणेर पोलीस ठाण्यात दारूच्या नशेत असलेल्या तरुणीने महिला PSI च्या हाताला चावा घेत गोंधळ घातल्याची धक्कादायक घटना घडली.

Akshay Badve

Baner police station chaos after bar fight in Pune : दारूच्या नशेत तरुणीने घेतला महिला पोलिस उपनिरीक्षकाच्या हाताचा चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील बाणेर पोलिस ठाण्यात घडला आहे. दारूच्या नशेत तरुण तरुणीचा पुण्यातील पोलिस ठाण्यात गोंधळ घातला. आत्महत्या करण्याची पोलिसांना धमकी दिली. पोलिसांनी तरुणीसह मित्रावर गुन्हा दाखल केला आहे. बालेवाडी येथील एका बारमध्ये मारहाण झाल्याचे सांगून बारमध्ये तसेच पोलीस ठाण्यात दारूच्या नशेत गोंधळ घातला.

या प्रकरणात महिला पोलीस उपनिरीक्षक यांनी फिर्याद दिली आहे. यावरून मानसी चंपालाल परिहार्या (२४) आणि युवराज निलेश परतानी (२४) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार तीन मार्च रोजी रात्री पावणे बारा ते चार मार्च पहाटे ५.३० पर्यंत सुरू होता. या घटनेनंतर पुणे पोलिसात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसी ही विद्यार्थिनी असून युवराज हा मूळचा हरियाणा या राज्याच्या असून पुण्यात नोकरी करतो. दोघेही मित्र असल्याने तीन मार्च रोजी पुण्यातील बालेवाडी येथील एका रेस्टॉरंट मध्ये ते पार्टीसाठी गेले. मद्यपान केल्यानंतर दोघांना कोणीतरी मारहाण केली. यावरून त्या दोघांनी हॉटेलमध्ये गोंधळ घातला.

संबंधित ठिकाणी पोहोचल्यानंतर महिला पोलीस उपनिरीक्षक यांना मानसीने "आम्हाला मारहाण झाली असून मला हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज आत्ताच पाहिजे" अशी मागणी केली. यावर हॉटेल मॅनेजर यांनी सीसीटीव्हीचे कंट्रोल युनिट मुंबईत असल्यामुळे उद्या फुटेज देतो असे सांगितले. पोलिसांनी या दोघांना पोलीस ठाण्यात येऊन तक्रार द्या असे सांगितले असता त्यांनी पोलिसांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. या घटनेनंतर पोलीस त्या दोघांना घेऊन बाणेर पोलीस ठाण्यात आले तसेच त्यांना वैद्यकीय उपचार करण्याबाबत सांगितले. या दोघांनी पुन्हा पोलीस ठाण्यात गोंधळ घालायला सुरुवात केली.

यावेळी मानसीने महिला अंमलदार यांना "तू मला विचारणारी कोण? तू माझ्याशी अशा शब्दात बोलू नको" असे बोलून गोंधळ सुरू केला. तसेच महिला पोलीस उपनिरीक्षक यांचा युनिफॉर्म ओढून त्यांच्या हाताला चावा घेतला. "मी सुसाईड करून बाणेर पोलीस स्टेशन आणि तुम्हा सर्व पोलिसांची नावे लिहील" अशी धमकी सुद्धा यावेळी तिने दिली. दुसऱ्या बाजूला, युवराज ने सुद्धा "मी कोण आहे हे तुम्हाला दाखवून देतो माझी पावर वापरून तुमची नोकरी घालवतो," अशी धमकी पोलिसांना दिली. दोघांनी "आम्ही उद्या सकाळी उपचार घेऊन पुन्हा पोलीस ठाण्यात येऊ" असे सांगितले मात्र अजून पर्यंत ते दोघेही पोलीस ठाण्यात आलेले नाहीत. दरम्यान सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल गांधींच्या अमित शहांवरील आरोपांनंतर लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी ३ पर्यंत स्थगित

ICC Ranking : आयसीसी रँकिंगमध्ये मोठा उलटफेर; वनडेमध्ये शुभमन गिल, टी २० मध्ये वैभव सूर्यवंशीची जबरदस्त झेप

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

चांदीच्या अंगठ्यांच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स; जी बघाल ती आवडेल

Rakhi Sawant slams Kangana Ranaut: 'आधी स्वतःचं चारित्र्य पाहा'; कंगना रणौतला चुडैल म्हणत राखी सावंत भडकली

SCROLL FOR NEXT