Navi Mumbai Accident  Saam tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai Accident : नवी मुंबईत अपघाताचा थरार! मद्यधुंद पोलिसानं दुचाकीस्वाराला उडवलं, VIDEO

Navi Mumbai Accident news : नवी मुंबईत भीषण अपघात झाला. नवी मुंबईत मद्यधुंद पोलिसानं दुचाकीस्वाराला उडवल्याची घटना घडली.

Vishal Gangurde

नवी मुंबईच्या घणसोलीत भीषण अपघात

मद्यधुंद पोलिसाने दुचाकीस्वाराला उडवलं

अपघाताचा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाला

अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

विकास मिरगणे, साम टीव्ही

नवी मुंबईच्या घणसोलीतील सिम्प्लेक्स परिसरात अपघाताची धक्कादायक घटना घडली. एका मद्यधुंद पोलिसाच्या भरधाव वाहनाने दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघाताचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

माहितीनुसार, पोलिसाकडून वाहन अतिशय निष्काळजीपणे चालवले जात होते. या पोलिसाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर पोलिसाने दुचाकीस्वाराला धडक दिली. पोलिसाच्या वाहनाने जोरदार धडक दिली की, दुचाकीस्वार रस्त्यावर दूर पडला. त्यानंतर गंभीर जखमी झाला. माहिती मिळताच स्थानिक पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर या पोलिसांनी तपास सुरू केला.

पोलिसांनी तपासणी केली. त्यानंतर पोलिसाच्या वाहनात दारूच्या उघड्या आणि बंद बाटल्या देखील आढळल्या. यामुळे चालक मद्यधुंद अवस्थेत होता आणि कर्तव्यावर असताना दारू पित होता, असा संशय आणखी वाढला.

सध्या पोलिसांनी अंतर्गत तपास सुरू केला आहे. गाडी चालवणाऱ्या पोलिसाची ओळख पटवून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. स्थानिक रहिवाशांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. निष्काळजी आणि नियम मोडणाऱ्या पोलिसावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आडुळ खुर्द शिवारात मोसंबी तोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअपचा भीषण अपघात झाला. पिकअपचा ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. पिकअपच्या भीषण अपघातात वाहन चालकासह एकूण २५ मजूर जखमी झाले. तर त्यातील आठ जण गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Rules : बँक खात्यात ठेवावे लागणार 50 हजार रुपये? काय आहे नवा नियम? VIDEO

Mumbai Metro7A: ट्रॉफिकचं नो टेन्शन; दहिसर ते एअरपोर्ट फक्त ५० मिनिटात पोहोचा, जाणून घ्या Metro 7चा मार्ग, तिकीट दर अन् थांबे

रिक्षाचालकांची तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल झाल्यानंतर खळबळ

Shocking : मुंबईचा तरुण लातुरात आला, लाईव्ह येऊन सगळं सांगितलं; नंतर अचानक आयुष्य संपवलं

Sunday Horoscope : संडे ४ राशींसाठी ठरणार धोक्याचा? जाणून घ्यायचं असेल तर वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT