Pune Accident News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Accident News: पुण्यात मद्यधुंद कारचालकाने दुचाकीला उडवलं; तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर जखमी

Pune Accident News: पुण्यात मध्यधुंद कारचालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे.

Satish Daud

सचिन जाधव, साम टीव्ही | पुणे, १६ डिसेंबर २०२३

Pune Accident News

पुणे शहरातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. एका मध्यधुंद कारचालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. थरकाप उडवणारी ही घटना गुरुवारी रात्री खराडी परिसरात घडली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोनाली अविनाश रोकडे असे मृत तरुणीचे नाव आहे. तर तिचा मित्र अभिषेक अशोक गायकवाड गंभीर जखमी आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) आरोपी कारचालकाला अटक केली आहे. अशोक नामदेव असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत सोनाली आणि तिचा मित्र अभिषेक गुरुवारी रात्रीच्या सुमारास दुचाकीवरुन घरी जात होते. खराडी परिसरात (Pune News) एका मध्यधुंद कारचालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण (Accident) होती, की सोनाली आणि तिचा मित्र उंच उडून जमिनीवर आदळले. या घटनेत सोनालीचा जागीच मृत्यू झाला. तर अभिषेक हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोनालीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी कारचालकावर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT