Drug mafia Lalit Patil health deteriorated treatment started at Sassoon hospital Saam TV
मुंबई/पुणे

Lalit Patil Health: मोठी बातमी! ड्रग्ज माफिया ललित पाटीलची तब्येत बिघडली; ससून रुग्णालयातच उपचार सुरू

Lalit Patil Health Updates: ड्रग्ज माफिया ललित पाटील याची तब्येत बिघडल्याची माहिती आहे. ललित पाटील याला पोट दुखी आणि हर्नियाचा त्रास सुरू झाला आहे.

Satish Daud

नितीन पाटणकर, साम टीव्ही

Lalit Patil Health Updates

ड्रग्ज माफिया ललित पाटील याची तब्येत बिघडल्याची माहिती आहे. ललित पाटील याला पोट दुखी आणि हर्नियाचा त्रास सुरू झाला आहे. गेल्या ४ दिवसापासून ललित पाटीलला हा त्रास होत असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे पुणे पोलिसांकडून त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयातच नेलं जात आहे. रुग्णालयात ऍडमिट न करता लित पाटीलवर उपचार करण्यात येत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नियमित उपचारानंतर त्याची रवानगी पुन्हा कोठडीत केली जात आहे. ललित पाटील (Lalit Patil) याला कोणताही गंभीर आजार नाही, पण त्याला पोटदुखी आणि हरण्याचा त्रास होतोय, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. ललित पाटील हा मूळ नाशिकचा रहिवासी आहे.

पुणे पोलिसांनी (Pune Police) त्याला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. विशेष म्हणजे ललित पाटील याला पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर तो जेलमध्ये कैद होता. तो येरवडा कारागृहात गेल्या तीन वर्षांपासून कैद होता.

या कालावधीत ललित पाटील ९ महिने पुण्यातील ससून रुग्णालयात उपचाराच्या निमित्ताने दाखल होता. तिथे उपचार सुरू असताना अचानक ललित पाटील फरार झाला होता. त्याच्या फरार होण्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले होते. पोलिसांनी प्रचंड तपास करुन त्याला 15 दिवसांनी अटक केली.

या प्रकरणावरुन राजकीय वातावरण देखील तापलं आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात सरकारमधील दोन मंत्र्यांचा हात असल्याचा आरोप केला होता. दरम्यान, पुणे पोलिसांनी ललित पाटील याच्या घरावरही छापा टाकला होता. या छापेमारीत पोलिसांना ड्रग्जचा मोठा साठा सापडला होता. ललित पाटील हा खूप मोठा ड्रग्ज पेडलर होता हे समोर आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रक्ताचं पाणी होईपर्यंत वहिनींच्या पाठीशी उभे राहू : हसन मुश्रीफ

भाजप कार्यकर्त्याच्या घरावर बॉम्ब फोडला, आवाजाने परिसर हादरला; बचाव पथक मदतीला धावलं

Monday Important Remedies: घरात पैशांची तंगी सुरू आहे? सोमवारी हे 5 उपाय करा, महादेवाच्या कृपेने होईल भरभराट

Jalna: जालन्यात ज्वालामुखी? जमिनीतून निघतोय ज्वलनशील पदार्थ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; पाहा VIDEO

Water Shortage : नागपूरकरांसाठी महत्वाची बातमी! २ दिवस शहरातील पाणी पुरवठा राहणार बंद, कोणत्या परिसरांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT