Mumbai Crime Saam tv
मुंबई/पुणे

DRIची मोठी कारवाई; मुंबई विमानतळावर १७.१८ कोटींचं कोकेन जप्त, टांझानियाच्या महिलेला अटक

DRI action : DRIची मोठी कारवाई केलीये. मुंबई विमानतळावर १७.१८ कोटींची कोकेन जप्त केले.

Saam Tv

डीआरआयकडून मुंबई विमानतळावर एक मोठी कारवाई

अमली पदार्थ तस्करी प्रकरणी टांझानियाच्या महिला प्रवाशाला अटक

जप्त केलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत १७.१८ कोटी रुपये इतकी आहे

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआय (Directorate of Revenue Intelligence) मुंबई झोनल युनिटने मोठी कारवाई केली. विमानतळावर राबवलेल्या अचूक आणि टार्गेटेड कारवाईत तब्बल १.७१८ किलो कोकेन जप्त करण्यात आले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे १७.१८ कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी टांझानियाच्या एका महिला प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

विशिष्ट गोपनीय माहितीनुसार, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी एंटेबे (युगांडा) येथून मुंबईत आलेल्या महिलेची विमानतळावर चौकशी केली. तिच्या वस्तूची तपासणी केल्यावर दोन फूड पॅकेट्स, एक प्लॅस्टिक कंटेनर, एक पाउच तसेच पेलिट्समध्ये लपवलेले पावडर स्वरूपातील संशयित पदार्थ आढळून आला. तपासादरम्यान प्रवासी महिलेने गिळलेल्या दोन कॅप्सुल्स देखील अधिकाऱ्यांनी हस्तगत केल्या.

एनडीपीएस फील्ड टेस्ट किटद्वारे तपासणी केली असता सर्व पदार्थांमध्ये कोकेन असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संपूर्ण माल एनडीपीएस कायदा, 1985 अंतर्गत जप्त करत महिलेची अटक करण्यात आली आणि तिला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी डीआरआयची ही कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरत असून संस्था 'नशामुक्त भारत' घडवण्यासाठी सातत्याने अशा नेटवर्क्सचा पर्दाफाश करत आहे.

डीआरआयने आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीला रोखण्यासाठी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईच्या माध्यमातून आंतराष्ट्रीय तस्करांच्या नेटवर्कचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमली पदार्थ तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तीव्र आणि कठोर पावले उचलली जात आहेत,असा संदेश देखील डीआरआयने कारवाईतून दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime Branch: वसुली पोलीस! पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या ४ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

Bihar Election Result: २२७१ लोकांचा विश्वास… पण नियतीचा क्रूर खेळ; मतमोजणीच्या दिवशी उमेदवाराचा मृत्यू

By-Election Results: बिहारनंतर भाजपनं जम्मू-काश्मीरमध्ये उधळला गुलाल; CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का, जाणून घ्या सर्व ८ पोटनिवडणुकांचे निकाल

Bihar Election Result Live Updates : बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक - राहुल गांधी

Fact Check : 7 तारखेला पगार न मिळाल्यास बॉसला जेल? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT