Babasaheb Ambedkar statue  Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची महेश गायकवाड यांच्याकडून पाहणी

Dr.Babasaheb Ambedkar statue : कल्याण पूर्व भागातील महापालिकेच्या ड प्रभाग कार्यालयाशेजारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय.स्मारकाचे लोकार्पण येत्या १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी होऊ शकते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजीत देशमूख, कल्याण:

Shivsena Leader Mahesh Gaikwad Inspection Of Babasaheb Ambedkar statue :

कल्याण पूर्व भागातील महापालिकेच्या ड प्रभाग कार्यालयाशेजारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय. या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण येत्या रविवारी १० मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आज या ठिकाणी कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी पाहणी केली. यावेळी महेश गायकवाड यांनी याची माहिती दिली. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष अण्णा रोकडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.(Latest News)

रविवारी दुपारी साडेतीन वाजता सूचक नाका येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यानिमित्त सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

ड प्रभाग कार्यालयाशेजारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे. या स्मारकासमोर उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती पुतळयाचे अनावरण होईल. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून हे स्मारक साकारले जात आहे. वर्षभरात स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी वचन दिले होते.

स्मारकाचे लोकार्पण येत्या १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी होऊ शकते. दरम्यान भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात एका जमीनीच्या वादातून कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. त्यात महेश गायकवाड हे जखमी झाले होते. त्यातून बरे झाल्यानंतर त्यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची पाहणी केली आहे. त्यामुळे आता महेश गायकवाड एक्टिव्ह मोडवर आले आहेत .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

SCROLL FOR NEXT