Eknath shinde And Devendra fadnavis Saam TV
मुंबई/पुणे

Farmers: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भरपाईच्या रकमेत प्रती हेक्टर दुपटीने वाढ

आता दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंंत मदत मिळणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना (Farmers) शासनाने मोठा दिलासा दिला आहे. नुकसान भरपाईच्या रकमेत प्रती हेक्टर दुपटीने वाढ करण्यात आली आहे. महसूल व वन विभागाने हा निर्णय जाहीर केला आहे.

नव्या भरपाईनुसार, जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी ६ हजार ८०० रुपयांऐवजी आता १३ हजार ६०० रुपये मिळणार आहेत. बागायत पिकाच्या नुकसानीसाठी १३ हजार ५०० ऐवजी आता २७ हजार रुपये मिळणार आहेत. (Latest Marathi News)

तर बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी १८ हजार ऐवजी आता मिळणार ३६ हजार रुपये मिळणार आहेत. नुकसानीची मर्यादाही वाढवली. दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंंत मदत मिळणार आहे.

राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली होती. यामुळे सोयाबिय, कापूस यासह अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. पूरपरिस्थितीमुळे झालेल्या या नुकसानीची वाढीव मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने 22232.45 लाख रुपये इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी दिली आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात या निधीची तरतूद पुरवणी मागण्याद्वारे करण्यात येईल. त्यानुसार हा निधी विभागीय आयुक्तांना किंवा शासनाचे आदेश येतील त्याप्रमाणे वितरित करण्याचे आदेश दिले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Onion : चाळीत ठेवलेला ७०० क्विंटल कांदा जाळला; सात लाख रुपयांचे नुकसान, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

Maharashtra Live News Update : नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराविरुद्ध स्थानिकांचे आणि माजी नगरसेवकांचे साखळी उपोषण

धावत्या एक्स्प्रेसच्या टॉयलेटमध्ये बलात्कार झाल्याचं तरुणीनं सांगितलं, पण CCTV फुटेजमुळं हादरवणारं सत्य आलं समोर

Mumbai News: मुंबईच्या सांताक्रुझमध्ये अपघाताचा थरार; भरधाव बाईकच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, VIDEO

Landslide: उत्तरकाशीत भूस्खलन; शेकडो घरं, दुकानं ढिगाऱ्याखाली दबली, ६० जण बेपत्ता, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

SCROLL FOR NEXT