Raj Thackeray/Sujat Ambedkar Saam TV
मुंबई/पुणे

तुमचा संपलेला पक्ष हिंदू-मुस्लिम दंगलीवर उभा करु नका; आंबेडकरांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

'तूम्ही शरद पवारांची मुलाखत घ्या, तुमचा संपुर्ण पक्ष भाड्याने लावून दुसऱ्याच्या प्रचाराला फिरा'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण शिंदे -

मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) यांना विनंती आहे तूम्ही शरद पवारांचा इंटरव्यू घ्या, संपुर्ण पक्ष भाड्याने लावून दुसऱ्याच्या प्रचाराला फिरा, पण तुमचा संपलेला पक्ष हिंदु-मुस्लिम दंगलीवर उभा करु नका अशी टीका सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरेंवर केली आहे. ते चुनाभट्टी, एटीआय येथील वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) कार्यालयाजवळील आयोजित सभेत बोलत होते.

ते म्हणाले, आपली ताकद कमी होणारं नाही. मागच्या निवडणुकांपासून परिस्थिती बदलली आहे. आपलं स्वप्न पूर्ण करायचं असेल वंचितांची सत्ता आणायची असेल तर घरोघरी जाण गरजेचं आहे. लाटेवर जायचं नाही कारण नरेंद्र मोदी (Narendra Modi) सुद्धा लाटेवर पंतप्रधान झाले आहेत. मागील दोन निवडणुकांपासून लक्षात आलं आहे की, आपण स्वबळावर निवडणूक लढू शकत नाही. आता आपण आपला समाज सोडून इतर समाजच्यातील लोकांना आपल्या पक्षाशी जोडायच आहे असं ते म्हणाले.

तसंच, राज ठाकरे यांना विनंती आहे तूम्ही शरद पवार (Sharad Pawar) यांचा मुलाखत घ्या, तुमचा संपुर्ण पक्ष भाड्याने लावून दुसऱ्याच्या प्रचाराला फिरा, पण तुमचा संपलेला पक्ष हिंदु-मुस्लिम दंगलीवर उभा करु नका अशी जहरी टीका त्यांनी ठाकरेंवर केली तसंच महाराष्ट्र पोलिसांना माझं आव्हान आहे. तुमच्या सर्वांच्या समोर काल वक्तव्य केलं आहे त्यामूळे तुम्हाला माहिती आहे कुणाला पकडायचंय, असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंच्या अटकेबाबत वक्तव्य केलं आहे.

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले की, आरेमध्ये कारशेड होऊ देणार नाही मात्र त्याठिकाणी कार शेड बांधण्याचा प्लान शिवसेनेचा होता. त्यांनी सांगितल की त्याठिकाणी आंदोलन करणाऱ्या मुलांवरील गुन्हे मागे घेऊ मात्र तसं झालं नाही. आता मुलांना परदेशात शिक्षणासाठी जायचं आहे त्यांना पासपोर्ट मिळत नाही. ज्यांनी आमच्यावर बी टीमचा आरोप केला त्यांनी मात्र सरकारं स्थापन करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांबरोबर सत्तास्थापन करण्यासाठीं तेच गेले होते असा टोलाही त्यांनी राष्ट्रवादीला लगावला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CNG Price Hike : पेट्रोल डिझेलनंतर CNG महागला; जाणून घ्या आजचे ताजे दर

Maharashtra School: आठवड्यातून फक्त 3 दिवसच भरणार शाळा? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? वाचा काय आहे नवा प्रस्ताव

Maharashtra News Live Update: नवतपाच्या पहिल्याच दिवशी विदर्भ होरपळला , ब्रह्मपुरीचा पारा तब्बल ४७.६ अंशांवर

Historic Fort : १०व्या शतकातील वैभव; डोंगरमाथ्यावर लपलाय 'हा' किल्ला, इतिहासप्रेमींसाठी खास ठिकाण

शिंदेसेनेच्या नगरसेवकाला बेदम मारहाण; लोखंडी रॉडने दोघांनी केला हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT