Dombivli x
मुंबई/पुणे

Dombivli Shocking : झोपेत दोघींना सापाचा दंश! काल मुलीनं जीव सोडला, आज मावशीचा मृत्यू; डोंबिवलीत हळहळ

Dombivli : डोंबिवलीत साप चावल्याने एका ४ वर्षीय मुलीचा आणि तिच्या मावशीचा मृत्यू झाला आहे. महापालिका रुग्णालय प्रशासन त्यांच्या मृत्यूला जबाबदार असल्याचे आरोप कुटुंबियांनी केला आहे.

Yash Shirke

  • डोंबिवलीत साप चावल्याने ४ वर्षांच्या मुलीचा आणि तिच्या मावशीचा मृत्यू झाला.

  • दोघींना महापालिका रुग्णालयात दाखल केले असता योग्य उपचार मिळाले नाहीत, असा कुटुंबियांचा आरोप.

  • घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Dombivli News :डोंबिवलीमधून एक दु:खद घटना समोर आली आहे. डोंबिवलीमध्ये साप चावल्याने ४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. घरात घुसलेला साप चिमुकलीनंतर तिच्या मावशीला देखील चावला. काल (२९ सप्टेंबर) मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज (३० सप्टेंबर) मुलीच्या मावशीचा देखील उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ४ वर्षांची प्राणवी डोंबिवलीत राहणाऱ्या तिच्या मामाच्या घरी आली होती. मावशीच्या बाजूला झोपली असताना पहाटे पाचच्या सुमारास प्राणवीला साप चावला. ती झोपेतून उठून रडायला लागली. रडताना पाहून मावशीने प्राणवीला मिठी मारली, मला काय होतंय हे सांगता न आल्याने प्राणवी रडत राहिली. थोड्या वेळाने तोच साप तिच्या मावशीलाही चावला. तेव्हा हा भयंकर प्रकार उघडकीस आला.

सर्पदंश झाल्यानंतर दोघींना महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल उपचार सुरु असताना ४ वर्षीय प्राणवीचा मृत्यू झाला. महापालिका रुग्णालय प्रशासन तिच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. प्राणवीच्या मृत्यूनंतर तिच्या मावशीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज तिचाही मृत्यू झाला.

कल्याण-डोंबिवली महापालिका रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे दोघींचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. रुग्णालयात योग्य उपचार आणि पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे दोघींचा जीव गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मांडला आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunny Deol: 'आज माझ्या वडिलांचा वाढदिवस...'; धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवशी सनी देओलची भावनिक पोस्ट

अनैतिक संबंध, 'नको ते व्हिडिओ' पाठवून ब्लॅकमेल; पोलीस महिलेच्या त्रासाला कंटाळून इन्स्पेक्टरनं आयुष्य संपवलं

मराठ्यांचं वादळ आता दिल्लीला धडकणार; मनोज जरांगे महायुती सरकारचं टेन्शन वाढवणार?

Saliva Benefits: तोंडातली लाळ तुमचे अनेक आजार करेल दूर, नैसर्गिक उपचार एकदा वाचाच

Maharashtra Live News Update: सांगली महापालिका निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार गट महायुती सोबत लढणार

SCROLL FOR NEXT