​Husband-Wife Dispute Ends in Double Tragedy Saam
मुंबई/पुणे

कौटुंबिक वाद टोकाला गेला; नवऱ्यानं बायकोला संपवलं, नंतर ट्रेनसमोर उडी मारली, डोंबिवली हादरली

​Husband-Wife Dispute Ends in Double Tragedy: डोंबिवली येथे कौटुंबिक वादातून पतीनं पत्नीची हत्या केली. तसेच आरोपी फरार झाला. नंतर पतीने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली.

Bhagyashree Kamble

  • कौटुंबिक वाद टोकाला गेला

  • पतीनं पत्नीला संपवलं

  • स्वत: रेल्वेसमोर उडी मारली

डोंबिवलीत गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असतानाच, कोळेगाव परिसरातून पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादातून आधी पतीनं पत्नीची हत्या केली. नंतर पतीनं ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तपासाला सुरूवात केली. पतीनं तणावातून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ही धक्कादायक घटना डोंबिवलीतील कोळेगाव परिसरातून उघडकीस आली आहे. पोपट दिलीप दहिज (वय वर्ष ३९) असे मृत आरोपीचं नाव आहे. तर, ज्योती दहिजे असे मृत महिलेचं नाव आहे. २६ नोव्हेंबर रोजी नवरा - बायकोमध्ये किरकोळ वादातून भांडण झालं. वादाचं रूपांतर हाणामारीत झालं.

याच किरकोळ वादातून पतीनं पत्नी ज्योती दहिजे हिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. तसेच तिचा गळा दाबून हत्या केली. यानंतर आरोपीनं मृतदेह घरात ठेवला. तसेच तो पसार झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी ज्योतीचा मृतदेह ताब्यात घेत रूग्णालयात पाठवले. तसेच तपासाला सुरूवात केली.

कौटुंबिक वादातून आरोपी पतीनं पत्नीची हत्या केल्याचं उघड झालं. पोलिसांनी आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल केला. तसेच फरार आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. याच दरम्यान, २ दिवसांनंतर पोलिसांना भांडूप रेल्वे स्थानक परिसरात एका व्यक्तीने ट्रेन समोर उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीबाबत माहिती काढली. दरम्यान, हा मृतदेह आरोपी पोपट दहिजे याचा असल्याची माहिती मिळाली. हे प्रकरण हत्येचं असल्याचं उघड झालं. या प्रकरणी सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Masoor Dal Chivda Recipe: मार्केटमध्ये मिळणारा कुरकुरीत मसूर डाळ मिक्स चिवडा घरी कसा बनवायचा?

Maharashtra Live News Update: मी कुठल्याही प्रकाराचा राजीनामा दिलेला नाही, रुपाली ठोंबरे यांची माहिती

Cold showers heart attack risk: थंड पाण्याच्या शॉवरमुळे ब्लड प्रेशर वाढून हार्ट अटॅकचा धोका? डॉक्टर सांगतात कशी घ्यावी काळजी

MBBSच्या २ विद्यार्थ्यांचा दुचाकीवरून अपघात, डोकं अन् तोंडातून रक्तस्त्राव, तासभर वेदनेने तडफडत होते

Tejashri Pradhan: टिव्हीवरच्या सुनबाईचा थाटच न्यारा, कांजीवरम साडीत केलं फोटोशूट

SCROLL FOR NEXT