Dombivli Shivsena News Saam TV
मुंबई/पुणे

Dombivli News : शाखेचा ताबा घेण्यावरुन ऐन दिवाळीत ठाकरे-शिंदे गटात राडा

डोंबिवलीमधील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेवर ताबा घेण्यावरुन पुन्हा एकदा शिंदे विरुद्ध ठाकरे गटात वाद झाला आहे.

प्रदीप भणगे

डोंबिवली : डोंबिवलीमधील शिवसेनेच्या (Shivsena) मध्यवर्ती शाखेवर ताबा घेण्यावरुन पुन्हा एकदा शिंदे विरुद्ध ठाकरे गटात वाद झाला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत शिवसेनेच्या दोन्ही गटात फटाके वाजले आहेत. दरम्यान दोन्ही गटांमध्ये राडा झाल्याची माहिती मिळताच पोलीसांनी (Police) घटनास्थळी दाखल होतं परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बंड केल्यापासून त्यांच्या गटाने शिवसेनेवर आपला दावा सांगितला आहे. यासाठी शिंदे गटाकडून सर्वात पहिल्यांदा शिवसेनेच्या शाखेवर आपला दावा केला होता. शाखा हे शिवसेनेचा महत्वाचा आणि अविभाज्य भाग आहे. त्यामुले शाखांवरती आपलं नियंत्रण रहावं यासाठी दोन्ही गटाकडून प्रयत्न केले जात आहेत.

पाहा व्हिडीओ -

मागील महिण्यात ठाण्यातील (Thane) शाखेवर देखील दोन्ही गटाकडून दावा करण्यात आला होता त्यावेळी देखील शिवसेनेच्या दोन्ही गटात राडा झाला होता. अशातच आता डोंबिवलीमधील (Dombivli) शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेचे अधिकृत रजिस्टेशन केली असल्याची माहिती शिंदे गटाकडून साम टीव्हीला देण्यात आली आहे.

दरम्यान, 14 ऑक्टोबर रोजी हे रजिस्ट्रेशन वर्धमान इंटरप्रायजेस आणि शिंदे गटातील समर्थक जितेन पाटील यांच्यात झाल्याची माहिती देखील आता समोर आली आहे. तर उद्धव ठाकरे गटातील महिला पदाधिकारी शिल्पा मोरे यांनी पोलिसांसमोर शाखेच्या परिसरात जोरदार आरडाओरड करायला सुरुवात केली होती. त्यामुळे शाखेवर सध्या शिंदे गटाने दावा केला असला तरी ठाकरे गटाने तो दावा मान्य केलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : कुठलंही काम शंभर टक्केच करतो, अन्यथा...; अजित पवारांचं शरद पवारांसोबत जोरदार भाषण

Maharashtra Live News Update: स्मार्ट सिटीचा स्मार्टपणा उघड, कल्याण डोंबिवलीत बाईकचा लाईट लावून स्मशानभूमीत अंत्यविधी

Honey Trap: मोठी बातमी! बहीण-भावाचा हनी ट्रॅपचा प्लॅन; आमदाराशी मैत्री करत मोबाईलवर पाठवले अश्लील चॅट अन् व्हिडिओ

Relationship Tips: या छोट्या चुकांमुळे तुमच्या नात्यात येईल दुरावा, वेळीच घ्या काळजी

Mumbai To Solapur: सोलापूरकरांसाठी खुशखबर! मुंबई-सोलापूर विमानसेवा 'या' तारखेपासून सुरू

SCROLL FOR NEXT