Yuvasena Shrikant Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Shrikant Shinde News: भाजप-शिवसेनेत सर्व काही आलबेल?, डोंबिवलीतील नेत्यांबद्दल बोलताना श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केली नाराजी

Shrikant Shinde on Shiv Sena Bjp Alliance: भाजप-शिवसेनेत सर्व काही आलबेल? श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केली नाराजी

सुरज सावंत

Shrikant Shinde on Shiv Sena Bjp Alliance: ''काही नेते युतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत'', असं शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत. काही शुल्लक कारणावरून शिवसेना आणि भाजप (Shiv Sena Bjp Alliance) युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं स्वार्थी राजकरण सुरु असल्याचं श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत.

त्यांच्या या वक्तव्यानंतर युतीत खरच सर्व काही अलबेल की जागा वाटपावरून युतीतही रस्सीखेच सुरू आहे? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. श्रीकांत शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना -भाजप युतीमध्ये सर्व काही ठीक आहे ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. एका व्हिडीओच्या (Viral Video) माध्यमातून ते असं म्हणाले आहेत.

काय म्हणाले श्रीकांत शिंदे?

श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) म्हणाले आहेत की, ''२०२४ साली नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांना पुन्हा या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान करण्याचा आमचा आणि देशातील तमाम जनतेचा निर्धार आहे. त्यासाठी आम्ही प्राणपणाने प्रयत्न करू. परंतु, काही शुल्लक कारणांसाठी शिवसेना - भाजप युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे स्वार्थी राजकारण डोंबिवलीतल्या काही नेत्यांकडून सुरू आहे.'' (Latest Marathi News)

ते म्हणाले, ''मला व्यक्तीशः कोणत्याही पदाची लालसा नाही. येत्या लोकसभेच्या निवडणूकीत कुणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय शिवसेना - भाजप युतीचे वरिष्ठ नेते घेतील. मला उमेदवारी दिली नाही तरी जो कुणी उमेदवार असेल त्याचा एकदिलाने आम्ही प्रचार करू आणि त्याला विजयी करू.'' (Maharashtra Politics)

'तर मी माझ्या पदाचा राजिनामा देण्यास तयार'

''श्रीकांत शिंदे पुढे म्हणाले, ''केंद्रात पुन्हा भाजप- शिवसेना युती आणि मित्र पक्षाचे सरकार स्थापन करणे हेच आमचे ध्येय आहे. त्या दिशेने आम्ही करत असलेल्या कामांना जर कुणाचा विरोध असेल, कुणाला पोटदूखी होत असेल आणि युतीमध्ये जर विघ्न निर्माण होत असेल, तर मी माझ्या पदाचा राजिनामा देण्याची तयारी आहे.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

Maharashtra Weather : थंडीची चाहुल लागताच 'या' जिल्ह्यांवर पावसाचं सावट, हवामानाचा आजचा अंदाज काय?

Sharad Pawar: 'गद्दार गणोजीला सुट्टी नाही'; मुंडे-भुजबळांनतर शरद पवार यांचा दिलीप वळसेंवर प्रहार

Today Horoscope: अचानक हाती पैसा मिळेल, पगारवाढ होण्याची शक्यता; वाचा तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT