Police arrested a serial burglar after tracking him through multiple CCTV cameras in Dombivli and Ulhasnagar. Saam Tv
मुंबई/पुणे

९५ CCTV पाहून पोलिसही दमले! ७ घरफोड्यांचा मास्टरमाईंड अखेर कचाट्यात सापडला

Dombivli Burglary Case Solved With CCTV Footage: डोंबिवलीतील घरफोडी प्रकरणात पोलिसांनी ९५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करत सराईत चोरट्याला उल्हासनगरातून अटक केली.

Omkar Sonawane

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण सूचकनाका परिसरात बंद हॉटेलचे शटर वाकवून रोकड व मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला डोंबिवली मानपाडा पोलिसांनी उल्हासनगरातून अटक केली आहे. अनिल संजु रूपवते वय २० वर्ष असे अटक आरोपीचे नाव असून त्याने कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथ परिसरात तब्बल ७ घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोमीन उमर शेख यांनी त्यांचे सुचक नाका, नेतीवली, कल्याण पूर्व येथील हॉटेल बंद करून घरी गेले असता २१ मार्चच्या मध्यरात्री ते २२ मार्चच्या पहाटे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी हॉटेलचे शटर वाकवून लॉकरमधील रोख रक्कम व दोन मोबाईल फोन चोरी केले.

याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळापासून उल्हासनगरातील राहुलनगरपर्यंत तब्बल ९५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी उल्हासनगरातील चक्कीनाका परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून २९ मार्च रोजी त्याला अटक केली.

तपासादरम्यान आरोपीने आपल्या साथीदार संजु किसन वापरी यांच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच त्याने परिसरातील आणखी ७ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपीकडून सुमारे २ लाख ८ हजार रुपये किंमतीचे १२ मोबाईल फोन, एक पांढऱ्या रंगाची अॅक्टिवा दुचाकी आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish - Raja Shivaji Collection : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची यशस्वी घोडदौड; २२व्या दिवशीही छप्परफाड कमाई, वर्ल्डवाइड कलेक्शन किती?

Virar Tourism : नारळाची झाडं, खळखळणाऱ्या लाटा; विरारमध्ये लपलंय निसर्गरत्न, 'हे' आहे वीकेंड ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन

Maharashtra News Live Update: गुलाबराव पाटील यांनी मुलासाठी मागितली उमेदवारी

CNG Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री! पेट्रोल-डिझेलनंतर आता CNGही महागला, जाणून घ्या नवीन दर

डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न; IRGCनं रचला होता कट

SCROLL FOR NEXT