Dombivli Politics  Saam tv
मुंबई/पुणे

Dombivli Politics : मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच विरोधात बॅनरबाजी, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

ravindra chavan News : डोंबिवलीत मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच विरोधात बॅनरबाजी पाहायला मिळाली. या प्रकारामुळे शहरातील राजकीय वातावरण तापलं आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

कल्याण :- डोंबिवलीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या विरोधात बॅनरबाजी केल्याने राजकीय वातावरण तापलं आहे . रविंद्र चव्हाण यांचा शुक्रवारी वाढदिवस होता. या निमित्ताने डोंबिवली शहरात काही बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर '२० सप्टेंबर हॅप्पी खड्डे डे, डोंबिवलीकर" असा मजकूर लिहिला होता. हे बॅनर कुणी लावले कुणाच्या सांगण्यावरून लावण्यात आले, याबाबत विविध चर्चा रंगल्या.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या विरोधात लावण्यात आलेले बॅनर पोलिसांनी उतरवून घेतले. यानंतर पोलिसांनी बॅनर छापणाऱ्या जॉली प्रिंटरच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोणाच्या सांगण्यावरुन हे बॅनर लावण्यात आले आहे. याचा तपास विष्णूनगर पोलिसांनी सुरु केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा आज वाढदिवस असल्याने अनेक ठिकाणी त्यांच्या समर्थकांनी बॅनर लावले होते. अनेक समर्थकांनी त्यांना बॅनरमार्फत शुभेच्छा दिल्या. मात्र डोंबिवली पश्चिमेत काल रात्रीच्या सुमारास काही ठिकाणी असे बॅनर लावले गेले. ज्या बॅनरवर सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना लक्ष्य करण्यात आलं होतं. या वादग्रस्त बॅनरमुळे शहरातील वातावरण चांगलंच तापलं होतं. बॅनर छापण्याचे आणि लावण्याचे काम जॉली प्रिटंरला दिले होते.

विष्णूनगर पोलिसांनी रात्रीच हे बॅनर उतरवून बॅनर छापणाऱ्या आणि लावणाऱ्या जॉली प्रिंटरच्या विरोधात गुन्हा दाखल केला. हा बॅनर कोणी छापण्यास दिला होता. याचा तपासाकरिता दोन पथके नेमली आहेत. लवकरच बॅनर लावणाऱ्याचे नाव समोर येईल, याची शक्यता आहे. हा बॅनर डोंबिवली पश्चिमेतील सध्या शिवसेना शिंदे गटात असलेल्या पदाधिकाऱ्याने लावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद आता विकोपाला जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT