Dombivli CCTV Video Saam Tv
मुंबई/पुणे

Dombivli News: महिला कठड्यावर बसली, मस्करीत तो पकडायला गेला, अन् ती तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली; पाहा भयानक VIDEO

Dombivli CCTV Video: डोंबिवलीमध्ये मस्करीच्या नादात तिसऱ्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूप्रकरणी बंटी टाक नावाच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.

Priya More

अभिजीत देशमुख, डोंबिवली

मित्रासोबत मस्करी करत असताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना डोंबिवलीमध्ये (Dombivli) घडली होती. या घटनेचा धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. हा थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या महिलेच्या मृत्यूप्रकरणी बंटी टाक नावाच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांकडून (Dombivli Manpada Police) याप्रकरणाचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुार, मित्रांसोबत मस्करी करत असताना एका महिलेचा तोल गेला आणि ती इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली. या घटनेमध्ये महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. नगीनादेवी असं या मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. डोंबिवली पूर्व कल्याण-शीळ रोडवरील विको नाका परिसरात ग्लोब स्टेट इमारतीमध्ये ही घटना घडली होती. याच इमारतीमधील एका कार्यलयात नगीनादेवी साफसफाईचे काम करत होती.

या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, नगीनादेवी तिसऱ्या मजल्यावर पायऱ्यांजवळ असलेल्या कट्ट्यावर बसली होती. त्याचवेळी नगीनादेवीसोबत काम करणारा बंटी टाक तिच्याशी मस्करी करण्यासाठी येतो. मस्करी करता करता बंटी हातवारे करतो. त्याचा धक्का नगीनादेवीला लागतो आणि तोल जाऊन ती तिसऱ्या मजल्यावरून खाली पडते. तिच्यासोबत बंटी देखील खाली पडत असतो पण त्याठिकाणी असलेल्या काही जणांनी त्याचे प्राण वाचवले.

तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या नगीनादेवीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी घटनेची नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत मस्ती करणाऱ्या बंटी टाक याला अटक केली आहे. पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे डोंबिवलीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लाडक्या बाप्पाला निरोप देताना लहान मुलांना अश्रू अनावर

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT