Dombivli News Saamtv
मुंबई/पुणे

Ram Mandir: राममंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त डोंबिवलीत भव्य शोभायात्रा; रामलल्लाच्या वेशातील चिमुकल्यांनी वेधलं लक्ष

Dombivli News: डोंबिवलीत श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठान सोहळ्यानिमित्त भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. या यात्रेत प्रभू श्रीरामाच्या वेशभूषेत बच्चे कंपनी, भगवे फेटे घालून तरुण-तरुणींसह हजारो नागरिक सहभागी झाले होते.

Gangappa Pujari

अभिजीत देशमुख, कल्याण|ता. २१ जानेवारी २०२४

Ram Mandir Inauguration:

२२ जानेवारीला अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीरामांच्या मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. देशभरात राममंदिर उद्घाटन सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. राममंदिर उद्घाटन सोहळ्याच्या पुर्वसंधेला राज्यात ठिकठिकाणी शोभा यात्रा तसेच मिरवणूका काढल्या जात आहेत. डोंबिवलीत श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठान सोहळ्यानिमित्त भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. या यात्रेत प्रभू श्रीरामाच्या वेशभूषेत बच्चे कंपनी, भगवे फेटे घालून तरुण-तरुणींसह हजारो नागरिक सहभागी झाले होते.

अयोध्येत श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अवघे काही तास उरलेत. संपूर्ण देशभर रामभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण असून या सोहळ्यासाठी ठिकठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे. राजकीय पक्षांकडून कल्याण डोंबिवली मध्ये ठीक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कल्याण डोंबिवलीतील नागरिकांमध्ये देखील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह दिसून येतोय.

डोंबिवली जवळील पलावा या सोसायटीमध्ये जवळपास 20 ते 25 इमारतीमधील रहिवाशांनी एकत्र येऊन भव्य शोभायात्रा काढली होती. जवळपास दीड ते दोन हजार नागरिक या शोभायात्रेत सहभागी झाले होते. या शोभा यात्रेमध्ये श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीचा रथ, प्रभू श्रीरामाच्या वेशभूषेत अनेक लहान मुलं सहभागी झाली होती. महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग या रॅलीमध्ये आहे. संपूर्ण पलावा परिसर या शोभा यात्रेमुळे भगवामय झाला होता. यावेळी प्रभू श्रीरामाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेल्याचे पाहायला मिळाले.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चंद्रपुरात रामनामाचा विश्वविक्रम...

चंद्रपुरात (Chandrapur) 'सियावर रामचंद्र की जय' या रामनामाचा विश्वविक्रम झाला आहे. 35 हजार प्रज्वलित पणत्यासह चंद्रपूरच्या शामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय संस्थेच्या वतीने हजारो चंद्रपूरकरांनी रामाच्या प्रति सेवा रुजू केली. गिनीज रेकॉर्ड नोंद करणाऱ्या चमूने या अनोख्या विश्वविक्रमाचे अधिकृत प्रमाणपत्र दिले. या विश्वविक्रमासाठी पुढाकार घेणाऱ्या राज्याचे वनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी समाधानाची भावना व्यक्त केली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आपच्या 7 खासदारांना दिलासा, भाजप प्रवेशाला मंजुरी

Garam Pani Kund In Mandla History: बापरे चमत्कारच! बाराही महिने गरम पाणी वाहणारं हे कुंड नेमकं आहे तरी कुठे?

Pune : पुण्यातील नामंकित कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची रॅगिंग; ५ जणांवर गुन्हा

मुंबईहून १६६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड; भोपाळमध्ये केलं एमर्जन्सी लँडिग

लग्नाचं वचन देऊन Bigg Boss फेम अभिनेत्रीने 9 कोटींना लुटले; NRI तरुणाचा गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT