Dombivli Saam tv
मुंबई/पुणे

Dombivli : डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारतींमधील नागरिकांचं टेन्शन वाढलं

Dombivli Latest news : डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारतींमधील नागरिकांचं टेन्शन वाढवारी बातमी हाती आली आहे. या प्रकरणी चौकशी समितीची एकही बैठक न झाल्याची माहिती समोर आली आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

६५ बेकायदा इमारत प्रकरणी चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एक चौकशी समिती नेमली होती. या समितीची एकही बैठक झाली नाही. या समितीने तातडीने चौकशी करुन त्याचा अहवाल सादर करावा, अशी मागणी याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे केली आहे. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी शिनगारे यांची प्रत्यक्ष भेट घेतली.

डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारत प्रकरणात याचिकाकर्ते पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच माहिती अधिकारात हे प्रकरण उघड करुन त्याची चौकशी करण्याची मागणी कल्याण डोंबिवली महापालिकेकडे केली होती. महापालिकेने या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन बिल्डरांच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते.

या प्रकरणात एसआयटी नेमली गेली होती. त्याचबरोबर ईडीने देखील चौकशी केली होती. मात्र या प्रकरणाची चौकशी करण्याकरीता राज्य सरकारने समितीने नेमली होती. या समितीची एकही बैठक पार पडलेली नाही. या समितीचे अध्यक्ष ठाणे जिल्हाधिकारी होते. त्यांची याचिकाकर्ते पाटील यांनी भेट घेऊन सरकारने स्थापन केलेल्या समितीने चौकशी करुन त्याचा अहवाल तातडीने सरकारला सादर करावा.

65 बेकायदा इमारत प्रकरणात खोटे कागदपत्रे सादर करुन महारेरा प्राधिकरणाकडून बांधकाम प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. महारेराची ही फसवणूक झाली आहे. मात्र अशा प्रकारची फसवणूक झाल्यास महारेराकडून घर खरेदी करणाऱ्यांना प्रकल्पाच्या एकूण रक्कमेपैकी पाच टक्के रक्कम फसवणूक झालेल्या रहिवासियांना दिली जाते. महारेरानेही याबाबतीत पाऊल उचलून 65 बेकायदा इमारत प्रकरणातील फसवणूक झालेल्या रहिवासियांना पाच टक्के रक्कम द्यावी, अशी मागणी ही याचिकाकर्ते पाटील यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कारच्या धडकेत दुचाकीस्वार दोघांचा मृत्यू;भंडारा - पवनी महामार्गावरील घटना

आता जमिनीची वाटणी होणार मोफत, फडणवीस सरकारचा सर्वात मोठा निर्णय

Earthquake : मणिपूरला भूकंपाचे हादरे! ५.२ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Gold Rate Today: खुशखबर! चांदी ₹१०,०००नी स्वस्त ! सोन्याचे दर किती? वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Periods Mental Health : पीरियड्समध्ये न चुकता करा 'ही' कामे, चिडचिड अन् मूड स्विंग्स होणारच नाही

SCROLL FOR NEXT