Kalyan News Saamtv
मुंबई/पुणे

Dombivli News: हृदयद्रावक! प्ले झोनमध्ये खेळता खेळता खाली पडला; एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Dombivli News: सक्षम उंडे असे या मुलाचे नाव असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Gangappa Pujari

अभिजित देशमुख, प्रतिनिधी

Dombivli News:

डोबिंवलीमधून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. डोंबिवलीच्या मानपाडा परिसरात प्ले झोनमध्ये खेळत असताना खाली पडून पाच वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. परिसरातील हायप्रोफाईल रिजेन्सी अनंतम कॉम्प्लेक्सच्या क्लब हाऊस मध्ये ही घटना घडली. सक्षम उंडे असे या चिमुकल्याचे नाव असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, डोंबिवली पूर्वेकडे (Dombivli East) मानपाडा परिसरात (Manpada) रीजन्सी अनंत या हायप्रोफाईल सोसायटीमध्ये भरत उंडे हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांना सक्षम हा पाच वर्षाचा मुलगा आहे.

काल सायंकाळी (३१,ऑक्टोंबर) साडेपाच वाजण्याच्या सुमारास सक्षम हा या कॉम्प्लेक्सच्या क्लब हाऊसमधील प्लेझोन मध्ये खेळण्यासाठी गेला होता. यावेळी खेळत असताना तो अचानक खाली पडला. जवळच काम करणाऱ्या कामगारांचे सक्षमकडे लक्ष गेल्याने त्यांनी सक्षमला तात्काळ रुग्णालयात नेले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

सक्षम हा भरत उंडे यांचा एकुलता एक मुलगा होता. एकुलत्या एका मुलाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT