Dombivli Fire  Saam Tv
मुंबई/पुणे

Dombivli Palava Building Fire News: डोंबिवलीच्या पलावा सिटीतील टोलेजंग इमारतीला भीषण आग; आगीच्या ज्वाळा 8 व्या मजल्यावरून १८ व्या मजल्यापर्यंत

Dombivli Palava Fire: डोंबिवलीतील पलावा सिटीमधील इमारतीला भीषण आग लागलीय. वॉशिंग मशीनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. या आगीत कोणत्याच प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये.

Bharat Jadhav

अभिजीत देशमुख, खोणीगाव, डोंबिवली

Dombivli Palava Fire News:

डोंबिवलीतील पलावा सिटीमधील इमारतीला भीषण आग लागलीय. इमारतीमधील रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आहे. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग लागलेली इमारत ही १८ मजल्याची असून आठव्या मजल्यावर आग लागली, त्यानंतर गच्चीपर्यंत आग पसरलीय. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली जवळील खोणी पलावा येथील ऑरेलिया इमारतीच्या सातव्या माजल्यावर आग लागल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. सातव्या माळ्यावर बाल्कनीत ठेवलेल्या वॉशिंग मशीनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय.

ही आग इमारतीला लागून असलेल्या इमारतीच्या डकमध्ये पसरली. डकमधून चार-पाच मजल्यापर्यंत ही आग गेली होती. दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवलं. इमारतीमधील रहिवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. इमारतीच्या पुढील बाजूस असलेल्या डकमध्ये ही आग पसरल्याने फ्लॅटचे देखील नुकसान झालं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

मूड खराब झाल्यास मिळणार सुट्टी; भारतातही पॉलिसी राबवणार, उद्योगपतींचे संकेत

जरांगे प्रवास करत असलेल्या डिफेंडरवरून वाद; महागड्या गाडीतून जरांगेंचा आरक्षण दौरा

सरकारी-खासगी शाळा दिपकेंच्या रडारवर ; CJPचं शाळा सुधार आंदोलन

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT