Ravindra Chavan on Dombivli Fire Saam TV
मुंबई/पुणे

Dombivli Fire News: डोंबिवलीतील आग गंभीर, चौकशी करून कारवाई करणार; मंत्री रविंद्र चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया

Minister Ravindra Chavan on Dombivli MIDC Fire: डोंबिवलीत भीषण आग लागली आहे. या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या भीषण आगीनंतर मंत्री रविंद्र चव्हाण यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Vishal Gangurde

गणेश कवडे, साम टीव्ही प्रतिनिधी

डोंबिवली : डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये भीषण स्फोटानंतर तीन कंपनीला आग लागली. या भीषण स्फोट आणि आगीने परिसरात हादरून गेला आहे. या स्फोटामुळे कामगार आणि नागरिकांना मोठा फटका बसला आहे. या घटनेतील जखमींना उपाचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला आहे. या भीषण आगीवर मंत्री रविंद्र चव्हाण यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'डोंबिवलीतील आग गंभीर असून चौकशी करून कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे.

मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले, 'डोंबिवली एमआयडीसी फेज-2 मध्ये केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटाची घटना अतिशय गंभीर आहे. या स्फोटामुळे जखमी झालेल्या रुग्णांवर होणाऱ्या उपचारांना यश यावे, अशी प्रार्थना आहे. ही आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याबाबत प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत.

'या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी कृपया घाबरु नये. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन मंत्री चव्हाण यांनी केलं.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

खासदार सुप्रिया सुळे यांनी आगीवर प्रतिक्रिया दिली. 'सुरक्षेच्या संदर्भात सरकार गंभीर नाही. ड्रग्ज, रोड सेफ्टी असे दे कशातच सरकार गंभीर नाही. राज्यात दुष्काली स्थिती असून तरीसुद्धा लक्ष दिलं जात नाही. सरकार सुरक्षेकडे लक्ष देत नाही हे यातून दिसून येतंय'.

मंत्री उदय सामंत यांनी काय प्रतिक्रिया दिली?

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी डोंबिवली एमआयडीसी परिसरातील घटनास्थळी भेट दिली. यावर मंत्री उदय सामंत म्हणाले, 'या आगीच्या परिस्थितीचा आढावा घेतला. डोंबिवली एमआयडीसी परिसरात धोकादायक केमिकल बनवणाऱ्या कंपन्या स्थलांतरित करण्याबाबत लवकरच निर्णय घेणार आहे. या कंपन्यांसाठी पर्यायी जागांचा शोध सुरु आहे'.

खासदार श्रीकांत शिंदे काय म्हणाले?

श्रीकांत शिंदे म्हणाले, 'अति धोकादायक केमिकल बनवणाऱ्या कंपन्यांना शहराबाहेर स्थलांतरित करण्यात यावे, याबाबत मागणी करणार आहे. ज्या कंपन्यांमध्ये अतिशय धोकादायक केमिकल बनवले जातात, अशा कंपन्यांना शहराबाहेर वर्गीकरण करून पाठवण्याच्या निर्णय घेणार आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Shocking : शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला; अॅमस्टरडॅममध्ये उडाली मोठी खळबळ

Numerology: 'या' तारखेला जन्मलेले लोक समाजात कमावतात नाव; सूर्यदेवाची असते कृपा

Sunday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवा, आर्थिक व्यवहार टाळावे; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार होणार

चिमुकलीचा हात खेळता खेळता लिफ्टच्या दरजावात अडकला; धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, VIDEO

SCROLL FOR NEXT