Dombivli MIDC Fire Saam Digital
मुंबई/पुणे

Dombivli Fire : कंपनीत पहिला स्फोट कशामुळं झाला? डोंबिवली आगीच्या घटनेवर बोलताना CM एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण

CM Eknath Shinde : डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये स्फोटानंतर भीषण आग लागली आहे. आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनेचा आढावा घेतला आहे.

साम टिव्ही ब्युरो

अभिजित देशमुख

डोंबिवलीतील एमआयडीसीत कंपनीत झालेला स्फोट आणि त्यानंतर लागलेल्या आगीच्या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला. त्यानंतर आग लागली, असं शिंदे यांनी सांगितलं.

कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाला. या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. सर्वच यंत्रणा तिथे पोहोचली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले.

डोंबिवलीतील घटना वेदनादायक- देवेंद्र फडणवीस

डोबिंवलीतील दुर्घटनेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. या आगीत 8 जण अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकार्‍यांशी माझी चर्चा झाली असून, तेही 10 मिनिटांत घटनास्थळी पोहोचतील. एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्निशमन दलाच्या पाचारण करण्यात आलं आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो, असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

डोंबिवलीतील एमआयडीसी फेज २ मध्ये भीषण स्फोट झालं आहे. अनुदान केमिकल कंपनीत हा स्फोट झाल्याची माहिती आहे. स्फोटानंतर आगीने रौद्ररूप धारण केलं आहे. या दुर्घटनेत ५- ६ कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आग अटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या ७-८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

Thane News : कुपोषित मुलीच्या उपचारासाठी पैसे नाहीत, आई-वडील हतबल; उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील प्रकार

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

बीडमध्ये राडा! कोयता, लोखंडी रॉड अन् दगडानं ४ जणांना ठेचलं; रस्त्यावर रक्तच.. कारण फक्त | Beed Crime

Sitaare Zameen Par Collection: बॉक्स ऑफिसवर चमकले आमिर खानचे नशिब; गुरुवारी केली इतक्या कोटींची कमाई

SCROLL FOR NEXT