Dombivli MIDC Fire Blast Update: Saamtv
मुंबई/पुणे

Dombivli MIDC Fire: भीषण आग, स्फोटांवर स्फोट आणि नागरिकांची पळापळ; डोंबिवली MIDC मधील स्फोट आणि आगीनंतरच्या भयावह परिस्थितीचे VIDEO बघा

Dombivli MIDC Fire Blast Update: डोंबिवली एमआयडीसीमध्ये भीषण स्फोटानंतर लागलेल्या आगीने रौद्ररुप धारण केले आहे. परिसरातील कंपन्यांनाही या आगीची झळ बसत असून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Gangappa Pujari

अभिजित देशमुख, ता. २३ मे २०२४

डोंबिवली परिसरात एमआयडीसी फेज २ मध्ये भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. अंबर केमिकल कंपनीत हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत ५- ६ कामगार जखमी झाले आहेत. या आगीने रौद्ररुप धारण केले असून अग्निशमन दलाच्या ७-८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

एमआयडीसीत बॉयलरचा स्फोट

याबाबत सविस्तर माहिती अशी की, डोंबिवली एमआयडीसीमध्ये आज दुपारी दोन वाजता भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. अंबर केमिकल नावाच्या कंपनीत स्फोट होऊन भीषण आग लागली. हा स्फोटाची तीव्रता इतकी भयंकर होती की परिसरातील इमारतींमध्ये अनेक नागरिक जखमी झाले आहेत. तसेच काही इमारतींच्या काचाही फुटल्याचे सांगण्यात येत आहे.

परिसरात धुराचे लोट, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

आत्तापर्यंत चार जखमींना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती अग्निशन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. कंपनीत अद्याप किती कामगार अडकलेत याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

आसपासच्या कंपन्या आगीड्या भक्षस्थानी

दरम्यान, यास्फोटानंतर आगीने रौद्ररुप धारण केले असून आजुबाजूच्या कंपन्यांनापर्यंत ही आग पोहोचली आहे. या कंपनीच्या पाठीमागील बाजूस असलेले हुंडाई गाडीचे शोरूम देखील आगीच्या भक्षस्थानी आले असून 10 ते 12 गाड्या जळून खाक झाल्या आहेत. मनसे आमदार राजू पाटील यांच्यासह स्थानिक नेत्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दोन दिवसात सोनं- चांदी दरात मोठी वाढ! सोनं साडेचार हजारांनी तर चांदी अकरा हजार रुपयांनी महाग

Government Schemes : सरकारी योजनांवर VIDEO बनवा अन् कमवा तब्बल 1 लाख रुपये, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा

Vanita Kharat: फोन उचलताच बँक अकाऊंट रिकामं, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनीता खरातला हजारोंचा गंडा घातला; VIDEO चर्चेत

VIRAL VIDEO : बाबोSSS...दुबईतील शाळांची फी किती? विद्यार्थीनीच्या आईने सांगितला अविश्वसनीय आकडा, बघून डोळे पडतील पांढरेफट्ट

Sukanya Samruddhi Yojna : Sukanya Samruddhi Yojna: मुलींच्या भविष्यासाठी आताच निर्णय घ्या, सुकन्या समृद्धी योजनेत अशी करा गुंतवणूक?

SCROLL FOR NEXT