Dombivli MIDC Fire Blast Latest Update:  Saam Tv
मुंबई/पुणे

Dombivli MIDC Blast: डोंबिवली एमआयडीसी दुर्घटनेत आणखी ३ मृतदेह सापडले; स्फोटातील मृतांचा आकडा वाढला; बचावकार्य सुरू

Gangappa Pujari

अभिजित देशमुख, ता. २४ मे २०२४

डोंबिवली एमआयडीसी फेज-२ मध्ये काल बॉयलरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेनंतर परिसरातील अनेक कंपन्यांमध्ये भीषण अग्नितांडव पाहायला मिळाले होते. कालपासून या दुर्घटनेत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ तसेच अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या बचावकार्यादरम्यान आज आणखी तीन मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा ११ वर पोहोचला असून ६० हून अधिक लोक जखमी आहेत.

भीषण स्फोटानंतर लागलेल्या भयंकर आगीने डोंबिवली परिसर हादरुन गेला आहे. काल दुपारी दोन वाजता डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान कंपनीत भीषण स्फोट झाला. ही दुर्घटना इतकी भयंकर होती की परिसरातील २ ते ३ किमीपर्यंतच्या इमारतींच्या काचा फुटल्या तसेच हादरेही बसले. कालपासून या दुर्घटनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल तसेच एनडीआरएफच्या जवानांकडून बचावकार्य सुरू होते.

आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले होते. त्यानंतर सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले. कंपनीत अडकलेल्या कामगारांच्या नातेवाईकांनी परिसरात मोठी गर्दी केली होती. आज सकाळी या सर्च ऑपरेशन दरम्यान आणखी तीन मृतदेह सापडल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता ११ वर पोहोचला आहे.

दरम्यान, या दुर्घटनेत अजूनही काही कामगार अडकल्याची शक्यता आहे. कंपनीतील कामगारांच्या नातेवाईकांनी परिसरात मोठी गर्दी केली असून मृतांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अद्यापही शोधकार्य सुरू असून संबंधित कंपनीचे मालक प्रदीप मेहता आणि मलय प्रदीप मेहता यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

SCROLL FOR NEXT