डोंबीवलीत जागेच्या वादातून तुंबळ हाणामारी; घटनेचा व्हिडिओ व्हायरल Saam Tv
मुंबई/पुणे

डोंबीवलीत जागेच्या वादातून तुंबळ हाणामारी; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

लहान मुलांना आणि महिलांनाही देखील मारहाण करण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

प्रदिप भणगे

डोंबीवली: जागेच्या वादातून एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. धक्कादायक म्हणजे या मध्ये लहान मुलांना आणि महिलांनाही मारहाण करण्यात आली आहे. त्याचबरोबर घरात सर्व वस्तूंची तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

डोंबिवली पूर्वेतील पागड्याचा पाडा गावात आज अडीच वाजता एका घरात काही लोक घुसले आणि त्यांनी घरातील लोकांना मारहाण सुरू केली आहे. अरुण काळोखे त्यांची पत्नी त्यांच्या लहान मुलांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीच्या व्हिडिओ समोर आला आहे.

एवढेच नाही तर हल्ला करणाऱ्या लोकांनी घरामध्ये तोडफोड सुद्धा केली आहे. जागेच्या वादातून ही मारामारी झाली असल्याची माहिती अरुण काळोखे यांनी दिली आहे. अनेक दिवसापासून जागेवरून वाद सुरू आहे. आज हा वाद विकोपाला गेला. डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.तसेच या घटनेत दुसऱ्या गटातील एक महिला सुद्धा जखमी झाली आहे.

मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये दिसत आहे की कशाप्रकारे बेदम मारहाण केली जात आहे. सागर फराळ आणि त्यांच्या नातेवाईकांनी हल्ला केल्याचे समोर आले आहे. ज्या कुटुंबाला मारहाण झाली आहे ते कुटुंब भितीच्या वातावरणात जगत आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actress : 'वीण दोघांतली ही तुटेना' फेम अभिनेत्रीने खरेदी केली लग्जरी कार, नव्याकोऱ्या गाडीसोबत शेअर केला PHOTO

Crime News: स्मार्ट सिटी दाखवतो म्हणत सोबत नेलं, खोलीत कोंडून ठेवत ४ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार नंतर...

Maharashtra News Live Update:बोगस बियाणे देणाऱ्या कंपन्या ब्लॅकलिस्ट करणार

अमरावतीत भरदिवसा थरार! तरुणाची निर्घृण हत्या, हाताचा पंजाच छाटल्याने उडाली खळबळ

किडनी खराब होऊ नये म्हणून दिवसभरात किती पाणी प्यावे?

SCROLL FOR NEXT