डोंबिवली पश्चिमेतील टेल्कोसवाडी येथे जुन्या भांडणातून झालेल्या तरुणाच्या हत्या प्रकरणाचा विष्णूनगर पोलिसांनी २४ तासांत छडा लावला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. saam tv
मुंबई/पुणे

Dombivli Crime : त्या रात्री डोंबिवलीच्या तरुणासोबत नेमकं काय घडलं? 24 तासांत गूढ उकललं

dombivli crime news vishnunagar police : डोंबिवलीतील तरुणाच्या हत्या प्रकरणाचा २४ तासांत छडा लावण्यात विष्णूनगर पोलिसांना यश आलं आहे. जुन्या भांडणाच्या वादातून ही हत्या झाली. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे. तर दोन अल्पवयीन मुलांची बालसुधारगृहात रवानगी केली.

Nandkumar Joshi

संघर्ष गांगुर्डे, डोंबिवली | साम टीव्ही

डोंबिवली पश्चिमेतील टेल्कोसवाडी परिसरात तरुणाच्या हत्येमागील गूढ २४ तासांच्या आत उकललं आहे. पोलीस तपासात खळबळजनक माहिती उघड झाली आहे. जुन्या भांडणाच्या वादातून तरुणाची हत्या झाली होती. विष्णूनगर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि तिघांच्या मुसक्या आवळल्या. तसेच दोन अल्पवयीन मुलेही या हत्या प्रकरणात सामील असून, त्यांनाही ताब्यात घेतले. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी मृत मुलाच्या कुटुंबीयांनी केली आहे.

आरोपीनं बोलावलं अन्...

१९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११. १५ वाजताच्या सुमारास डोंबिवली पश्चिमेतील टेल्कोसवाडी परिसरात ही भयंकर घटना घडली. सन्नी सिंह आणि साहिल गायकवाड हे मित्र होते. साहिलने सनी सिंह याला मावसभाऊ गुड्डू (अर्थव) हिवाळे याच्याशी झालेल्या भांडणाची माहिती दिली होती. या वादात मारहाण झाल्याचेही सांगितले. दुसऱ्या दिवशी आरोपी दिशांत गायकवाड याने भांडण मिटवण्यासाठी साहिल गायकवाडला फोन करून डोंबिवली पश्चिमेकडील टेल्कोसवाडी येथे येण्यास सांगितले.

भांडण मिटलं, पण मनातला राग गेला नाही...

दोन्ही गटांनी भांडण मिटल्याचं सांगितलं. त्यानंतर दोन्ही गटातील तरूण तिथून निघून गेले. पण मनात राग होता. रात्री पावणे अकराच्या सुमारास साहिल आपल्या मित्रांसह टेल्कोसवाडी येथे जात असताना हर्षल गिरी, दिशांत गायकवाड, चिराग सावंत, कमलेश यांच्यासह दोन अल्पवयीन मुलं त्या ठिकाणी आले. साहिल आणि त्यांच्यात पुन्हा बाचाबाची झाली. वाद टोकाचा झाला. हर्षल गिरी, दिशांत गायकवाड, चिराग सावंत आणि कमलेशने साहिलला मारहाण सुरू केली.

मित्रांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, पण...

साहिलसोबतच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी हर्षलने धारदार चाकूने साहिलवर हल्ला चढवला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णूनगर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेत कारवाई केली.

या प्रकरणात हर्षद गिरी, दिशांत गायकवाड आणि कमलेश यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती एसीपी विजय मराठे यांनी दिली. दोन्ही अल्पवयीन बालकांना बाल न्याय मंडळ, भिवंडी येथे हजर करण्यात आले. त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ते कोणत्या देशद्रोहीला ब्लॅकमेल करत आहेत? रुबिओंच्या मुंबई भेटीवरून राहुल गांधींचं मोठं विधान; एपस्टीन फाईल्सवरून अमेरिकेचा भारतावर दबाव?

दुष्काळाची दाहकता वाढली, पाण्यासाठी नागरिकांची वणवण

CJP नेत्यांच्या पायात कायद्याच्या बेड्या, CJP समोर चार मोठी आव्हानं

कल्याण हिट अॅण्ड रन प्रकरणात खळबळजनक ट्विस्ट, फरार चालक हायप्रोफाईल कुटुंबातील, २५ वर्षाच्या तरूणाला न्याय मिळणार का?

मुंबईत ड्रग्जचा मोठा साठा सापडला! १० कोटींचं हेरॉईन जप्त, तस्करीचं कनेक्शन काय?

SCROLL FOR NEXT